Headlines

Aditya Thackeray & Amit Thackeray Joint Press Conference


राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या 26 जुलैच्या तिरंगा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत, हा

.

जिथे ठाकरे आहेत, तिथे आम्ही सुरक्षित

आदित्य ठाकरे म्हणाले की, अनेक विद्यार्थी त्यांना सांगत आहेत की, “जिथे ठाकरे आहेत, तिथे आम्ही सुरक्षित आहोत. तिथे आम्हाला अटक होणार नाही किंवा डिटेन केले जाणार नाही.” आंदोलनकर्ते शांततेने आंदोलन करत असून सरकार आणि पोलिसांनी परिस्थिती चिघळू देऊ नये, असेही त्यांनी नमूद केले.

फक्त तिरंगा, कोणतेही राजकीय झेंडे नाहीत

मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचे झेंडे, बॅनर किंवा घोषणाबाजी नसणार असल्याचे स्पष्ट करत आदित्य ठाकरे म्हणाले की, देशप्रेम मनात आणि हातात तिरंगा घेऊन सर्व नागरिकांनी या मोर्चात सहभागी व्हावे. हा संदेश दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपवर गंभीर आरोप

आदित्य ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावरही जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांवरील कारवाई, लाठीमार, टेझर, पेलेट गन आणि अश्रुधुराचा वापर यावरून त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. “देशात लोकशाहीऐवजी हुकूमशाहीचे वातावरण निर्माण झाले आहे,” असा आरोप त्यांनी केला.

त्यांनी पुढे दावा केला की, सरकारमध्ये “देशद्रोही आणि युवकविरोधी मानसिकता” काम करत असून विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या आवाजाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. “भाजप हा देशद्रोही, युवाद्रोही आणि शिक्षणद्रोही पक्ष आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.

‘न्युरेनबर्ग ट्रायल्स’चा उल्लेख

दिल्लीतील आंदोलन हाताळणाऱ्या अधिकाऱ्यांना इशारा देताना आदित्य ठाकरे यांनी दुसऱ्या महायुद्धानंतर झालेल्या ‘न्युरेंबर्ग ट्रायल्स’चा उल्लेख केला. जुलमी आदेशांची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही नंतर जबाबदार धरले गेले होते, याची आठवण त्यांनी करून दिली.

अमित ठाकरेंचाही सरकारवर हल्लाबोल

अमित ठाकरे यांनीही पत्रकार परिषदेत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. “हा मोर्चा कोणत्याही पक्षाचा नसून विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी आहे,” असे ते म्हणाले. सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून उचलून नेण्याच्या घटनेचा उल्लेख करत त्यांनी सरकारवर टीका केली. तसेच दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमार, टेझर आणि खिळे असलेल्या लाठ्यांच्या वापराबद्दलही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. मुंबई पोलिसांनी आंदोलनकर्त्यांशी संयमाने वागल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. मात्र, विद्यार्थ्यांना डिटेन करण्याऐवजी लोकशाही मार्गाने आंदोलन करू द्यावे, असेही त्यांनी म्हटले. यावेळी दोन्ही नेत्यांनी 26 जुलै रोजी होणाऱ्या तिरंगा मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करत, हा मोर्चा विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आणि देशाच्या भविष्यासाठी असल्याचे सांगितले.

हेही वाचा…

कबुतर, कुत्र्यांकडे लक्ष द्यायला वेळ, पण कॉकरोचकडे बघायला वेळ नाही:उद्धव ठाकरेंची न्यायव्यवस्था आणि केंद्र सरकारवर टीका

ठाकरे बंधूंच्या संयुक्त पत्रकार परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि न्यायव्यवस्थेवर जोरदार टीका केली. “न्यायालयाला कबुतर, कुत्र्यांकडे लक्ष द्यायला वेळ आहे; पण कॉकरोचकडे बघायला वेळ नाही,” अशा शब्दांत त्यांनी न्यायालयाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमार, आंदोलनातील दडपशाही आणि सरकारच्या भूमिकेवरही त्यांनी सडकून टीका केली. येथे वाचा संपूर्ण बातमी

नीट पेपरफुटीविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार:26 जुलैला विद्यार्थ्यांसोबत मुंबईत भव्य मोर्चा, पालकांनाही मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन

नीट पेपरफुटी प्रकरण आणि देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलिसी कारवाईचा निषेध करत दोन्ही नेत्यांनी 26 जुलै रोजी मुंबईत संयुक्त मोर्चा काढण्याची घोषणा केली.

राज ठाकरे म्हणाले की, देशभरात सुरू असलेले विद्यार्थी आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण होते. मात्र, त्याला दडपण्यासाठी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींवर दबाव टाकला जात असून त्यांच्यावर लाठीमार करण्यात येत आहे. या कारवाईचे पडसाद आता संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रातही उमटत असल्याचे त्यांनी सांगितले. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.