स्केटिंग स्पर्धेत चिमुकल्याखेळाडूंनी गाजवले मैदान:स्पर्धेत नगर जिल्ह्यासह परजिल्ह्यातील खेळाडूंचा डंका
प्रतिनिधी | अहिल्यानगर जिल्ह्यातील आधुनिक २०० मीटर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सिंथेटिक स्केटिंग रिंकवर प्रथमच आयोजित करण्यात आलेली राजस्व स्पीड स्केटिंग स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेचे आयोजन राजस्व स्पोर्ट्स क्लबचे संस्थापक चेतन शहाणे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते. स्पर्धेचे नियोजन स्केटिंगपटू प्रशांत पाटोळे यांनी केले. स्पर्धेमध्ये विविध वयोगटांतील खेळाडूंनी चांगली कामगिरी करत प्रेक्षकांची मने जिंकली. मुलांच्या…