Headlines

Admin

आंबेडकर जयंती- आवाजाची मर्यादा ओलांडल्यामुळे 17 जणांवर गुन्हे:मिरवणुकीत यंदा सर्वाधिक 132.4 डेसिबल आवाजाची नोंद

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत डीजेचे नियम उल्लंघनप्रकरणी अखेर १४ दिवसांनी १७ जणांवर क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात व्यापारी क्षेत्रात ध्वनी मर्यादा ६५ डेसिबलची असताना त्याहून जवळपास दुप्पट १३२.४ डेसिबलची नोंद करण्यात आली आहे. बहुतांश मंडळांचा आवाज हा १०० डेसिबलच्या पार गेल्याच्या नोंदी पोलिसांकडून करण्यात आल्या आहेत. १४ एप्रिल…

Read More

नातीच्या लग्नाच्या दिवशीच आजोबांचा‎मृत्यू, दुःख बाजूला ठेवून वधूची पाठवणी‎:सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील हृदयद्रावक घटना‎

प्रतिनिधी | घाटनांद्रा आनंद आणि उत्साहाने भरलेल्या लग्नसोहळ्याला अचानक दु:खाची किनार लागल्याची हृदयद्रावक घटना घाटनांद्रा येथे मंगळवारी घडली. येथील माधवराव रामदास तायडे यांची कन्या गायत्री हिचा विवाह मंगळवारी (२८ एप्रिल) ठरलेल्या मुहूर्तावर सायंकाळी पार पडला. मात्र याच दिवशी तिचे आजोबा रामदास तायडे (७७ ) यांचे निधन झाल्याने संपूर्ण तायडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. रामदास श्रीपत…

Read More

वाळूजमधील कारखान्याला आग; 50 कामगार बचावले:अडीच तासांनंतर आगीवर नियंत्रण

वाळूज एमआयडीसीतील रांजणगाव (शेणपुंजी) येथील श्री वरद इंडस्ट्रीज या कारखान्याला २९ एप्रिलच्या रात्री भीषण आग लागली. सुदैवाने आगीच्या वेळी ड्यूटीवर असलेल्या ५० कामगारांनी प्रसंगावधान राखून सुरक्षित स्थळी धाव घेतल्याने जीवितहानी टळली. मात्र, या दुर्घटनेत कारखान्याचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे. गट क्रमांक १२६ मधील प्लॉट क्रमांक ८ वर असलेली ही…

Read More

संभाजीनगरचा प्रोझोन माॅल रहेजा समूह खरेदी करणार:1300 कोटींचा व्यवहार, कोइम्बतूरच्या मॉलचाही समावेश

‘के रहेजा कॉर्प’ समूहाचा भाग असलेल्या ‘इनॉर्बिट मॉल्स’ने शहरातील ‘प्रोझोन मॉल’ खरेदी करण्याची तयारी केली आहे. रहेजा समूह संभाजीनगरसह कोइम्बतूर येथील मॉल खरेदी करणार असून हा व्यवहार १,३०० कोटी रुपयांचा आहे. ‘प्रोझोन रिअल्टी’ने शेअर बाजाराला या संदर्भात माहिती दिली आहे. तज्ज्ञांच्या मते, या व्यवहारामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात. तसेच ऑपरेशन्स व…

Read More

मराठवाड्यात 63 गावांची मदार टँकरवर‎:154 विहिरींचे अधिग्रहण संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक 45 गावांमध्ये टंचाई‎

यंदा मराठवाड्यात पावसाने ‎चांगली हजेरी लावली होती. मात्र,‎कडक उन्हाळ्यामुळे पाण्याचे ‎स्रोत वेगाने आटू लागले आहेत. ‎परिणामी, मराठवाड्याच्या बहुतांश‎ भागात पाणीटंचाईच्या झळा तीव्र‎होऊ लागल्या अाहेत.‎ प्रशासनाकडे पिण्याच्या‎ पाण्यासाठी टँकर्सची मागणी ‎वाढली आहे. सद्यःस्थितीत बीड‎आणि धाराशिव हे दोन जिल्हे‎ वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये टँकर‎ सुरू केले आहेत. विभागीय‎ आयुक्तालयाच्या २९ एप्रिलच्या‎ अहवालानुसार, मराठवाड्यातील‎ छत्रपती संभाजीनगर, जालना‎ आणि लातूर…

Read More

10 वर्षांच्या नियमामुळे जिल्हा बँकेच्या रिंगणातून दिग्गज बाहेर‎:खासदार भुमरे, माजी मंत्री सत्तार, नितीन पाटील यांना संधी नाही, मुले-पत्नी मैदानात‎

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी ‎बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. केंद्र‎सरकारच्या नवीन बँकिंग सुधारणा अधिनियम‎२०२५ मुळे जिल्ह्यातील प्रस्थापित राजकारण्यांना‎मोठा धक्का बसला आहे. सलग १० वर्षे संचालक‎पदावर राहिलेल्या नेत्यांना आता निवडणूक‎लढवता येणार नसल्याने या दिग्गजांनी आपल्या‎कुटुंबातील वारसदारांना रिंगणात उतरवण्याची‎तयारी पूर्ण केली आहे.‎ ‎ बँकिंग क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी केंद्राने‎सलग २ कार्यकाळ (१० वर्षे) संचालक‎राहिलेल्यांना निवडणूक लढवण्यास बंदी…

Read More

पेट्रोलमध्ये 100% इथेनॉल मिश्रणाच्या गाड्यांची तयारी:वाहन उत्सर्जन नियम बदलण्याचा प्रस्ताव

रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय मोटार वाहन नियमांमध्ये बदलाचा मसुदा जारी केला आहे. यामध्ये ई८५ (८५ टक्के इथेनॉल आणि पेट्रोल) आणि ई १०० (जवळपास शुद्ध इथेनॉल) यांसारख्या इंधनांचा औपचारिक समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉलचा वापर वाढवणे हा यामागचा उद्देश आहे. यामुळे आयात केल्या जाणाऱ्या तेलावरील देशाचे अवलंबित्व कमी होईल. सरकारने पेट्रोलमध्ये २० टक्के…

Read More

सिंहस्थातील पारंपरिक स्तंभ हाेणार ‘अमृतमंथन’ध्वजस्तंभ:नाशकात रामकुंडावर 51, त्र्यंबकमध्ये कुशावर्तावर उभारणार 31 फुटी नवी रचना

२०२७ मध्ये हाेणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात मानाचे स्थान असलेल्या ध्वजस्तंभांचे पारंपरिक रूप या वेळी बदलेल. नाशिकच्या रामकुंडावर ५१ तर आणि त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थ येथे ३१ फुटी व नवीन घाटावर ५१ फुटी ‘अमृतमंथन’ ध्वजस्तंभ साकारण्यात येतील. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ७ कोटी ९ लाख रुपयांचा प्रकल्पाचा आराखडा तयार केला आहे. पारंपरिक ध्वजस्तंभ या संकल्पनेला आध्यात्मिक संदर्भ देण्यात…

Read More

इंदोरा बायोमास बँकेला आग, 4 कोटींचे नुकसान:3 हजार टन तणस जळून खाक, इथेनॉल निर्मितीसाठी साठा

नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील इंदोरा येथील बायोमास बँकेला २७ एप्रिल रोजी दुपारी भीषण आग लागली. रामटेक-खात मुख्य मार्गावरील या घटनेत इथेनॉल निर्मितीसाठी साठवून ठेवलेले सुमारे ३ हजार टन तणस जळून खाक झाले. यामुळे कंपनीचे अंदाजे ३ ते ४ कोटी रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही बायोमास बँक शेतकऱ्यांकडून…

Read More

पुण्यात शिवसेना (उबाठा) नेतृत्वात लवकरच फेरबदल:संजय राऊतांचे आवाहन: संघटना मजबूत करा, 'मिसिंग लिंक' जोडा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पुणे शहर नेतृत्वात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता आहे. पक्षाची खरी ताकद संघटनेत असून, ती सत्तेवर अवलंबून नाही, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. यामुळे पक्ष पराभूत होत नाही आणि पुन्हा सत्तेत येण्याची क्षमता राखतो, असा विश्वास त्यांनी दाखवला. पुण्यातील एका बैठकीत राऊत यांनी कार्यकर्त्यांना तळागाळात संघटन मजबूत करण्याचे…

Read More