![]()
यंदा मराठवाड्यात पावसाने चांगली हजेरी लावली होती. मात्र,कडक उन्हाळ्यामुळे पाण्याचे स्रोत वेगाने आटू लागले आहेत. परिणामी, मराठवाड्याच्या बहुतांश भागात पाणीटंचाईच्या झळा तीव्रहोऊ लागल्या अाहेत. प्रशासनाकडे पिण्याच्या पाण्यासाठी टँकर्सची मागणी वाढली आहे. सद्यःस्थितीत बीडआणि धाराशिव हे दोन जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये टँकर सुरू केले आहेत. विभागीय आयुक्तालयाच्या २९ एप्रिलच्या अहवालानुसार, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि लातूर या तीन जिल्ह्यांतील तहानलेली ६३ गावे आणि २६वाड्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी १०६ टँकर्स धावत आहेत. यात ४ शासकीय तर १०२ खासगी टँकर्सचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातटंचाईची झळ सर्वाधिक असून,४५ गावे आणि १२ वाड्यांसाठीतब्बल ७३ टँकर्स सुरू आहेत.जालना जिल्ह्यातील १६ गावे आणि१३ वाड्यांची तहान भागवण्यासाठी३१ टँकर्स (२ शासकीय व २९खासगी) धावत आहेत. लातूरजिल्ह्यातील २ गावे आणि १वाडीसाठी २ शासकीय टँकर्स सुरूआहेत. मराठवाड्यातील अन्यजिल्हे सध्या टँकरमुक्त आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा टँकर निम्मे मागील वर्षी (२०२५मध्ये) मार्च महिना संपण्यापूर्वीच अनेक भागांत टँकर सुरू करावे लागलेहोते. २० ते २२ एप्रिल २०२५ दरम्यान छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेडआणि लातूर या चार जिल्ह्यांतील १४२ गावे व २४ वाड्यांना तब्बल २१५टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. सुदैवाने, यंदा चांगल्या पावसामुळेगतवर्षीच्या तुलनेत टँकर्सची संख्या निम्म्याहून कमी (१०६) आहे. बीड, धाराशिवला यंदा टंचाईतून मिळाला दिलासा संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता आणि टँकरभरण्यासाठी लागणारे पाणी लक्षात घेऊनप्रशासनाने मराठवाड्यातील बीड आणिधाराशिव वगळता इतर सर्व जिल्ह्यांतीलखासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यास सुरुवातकेली आहे. आतापर्यंत एकूण १५४ खासगीविहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
Source link
मराठवाड्यात 63 गावांची मदार टँकरवर:154 विहिरींचे अधिग्रहण संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक 45 गावांमध्ये टंचाई