Headlines

आंबेडकर जयंती- आवाजाची मर्यादा ओलांडल्यामुळे 17 जणांवर गुन्हे:मिरवणुकीत यंदा सर्वाधिक 132.4 डेसिबल आवाजाची नोंद




भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत डीजेचे नियम उल्लंघनप्रकरणी अखेर १४ दिवसांनी १७ जणांवर क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात व्यापारी क्षेत्रात ध्वनी मर्यादा ६५ डेसिबलची असताना त्याहून जवळपास दुप्पट १३२.४ डेसिबलची नोंद करण्यात आली आहे. बहुतांश मंडळांचा आवाज हा १०० डेसिबलच्या पार गेल्याच्या नोंदी पोलिसांकडून करण्यात आल्या आहेत. १४ एप्रिल रोजी रात्रीच्या वेळी मिरवणुकीदरम्यान अनेक मंडळांनी वाहनांच्या मूळ रचनेत बेकायदा बदल करून विनापरवाना डीजे व बॉक्स स्पीकर लावून कर्णकर्कश आवाजात गाणी वाजवली. या प्रचंड आवाजामुळे मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांना आणि बंदोबस्तावरील पोलिसांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागला. काहींना आवाज सहन न झाल्याने कानांवर हात ठेवण्याची वेळ आली. उपनिरीक्षक किशोर तनपुरे आणि त्यांच्या पथकाने ध्वनी मापक यंत्राद्वारे आवाजाची पातळी मोजली. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना स्पीकरचा आवाज कमी करण्याच्या सूचना दिल्या, परंतु त्यांनी सूचनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आणि ध्वनी प्रदूषण सुरूच ठेवले. अधिक तपास उपनिरीक्षक देविदास शेवाळे करत आहेत. यांच्यावर गुन्हे दाखल रमाकांत जालिंदर इंगळे, रवी जाधव, सिद्धेश निवृत्ती गटे (डीजे मालक), कैलास गायकवाड मित्रमंडळाचे अध्यक्ष, शुभम दिनेश गवले, निखिल राहुल मोरे, संतोष लोखंडे, जुना बायजीपुरा जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष, आदित्य दादसाहेब शेळके, अनिल मगरे, डॉल्बी चालक (कराडवाला), अभिजित अर्जुन जाधव, दीपक मगनराव निकाळजे, राहुल मकासरे, अजय ज्ञानेश्वर रगाडे, सुमेध जाधव आणि राजीव जावळीकर अशा एकूण १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *