![]()
हिंदू संस्कृतीत शारदीय नवरात्रोत्सवाला आध्यात्मिकतेसह आरोग्याच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. देवीची आराधना करताना नऊ दिवस पाळले जाणारे उपवास म्हणजे धार्मिक व्रत नसून शरीर, मन, आत्म्याला नवसंजीवनी देणारी आरोग्यदायी पर्वणी ठरते. धावपळीच्या दैनंदिन जीवनशैलीत उपवासामुळे पचनसंस्थेला विश्रांती मिळते. शरीरातील विषारी घटक नैसर्गिकरीत्या बाहेर पडण्यास मदत होते. सध्याचा काळ हा हवामान बदलाचा असल्याने उपवास करताना योग्य समतोल साधत आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे,’ असा सल्ला आहारतज्ज्ञ डॉ. ताकसांडे यांनी दिला. उपवासाच्या काळात पोट रिकामे न ठेवता पचनास हलका, पोषक आहार घेणे आवश्यक आहे. आहारात ताजी फळे, ड्रायफ्रूट्सचा समावेश करावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी दिवसभरात नियमित पाणी, ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी यासारखी आरोग्यदायी पेये घ्यावीत. याउलट, उपवासाच्या नावाखाली तळलेले, तुपकट, अति गोड अथवा साबुदाण्यासारखे जड पदार्थ खाणे कटाक्षाने टाळावे. चहा-कॉफीसारख्या कॅफिनयुक्त पेयांमुळे डिहायड्रेशनचा धोका वाढत असल्याने ती वर्ज्य करावीत आणि पुरेशी शांत झोप घ्यावी. गर्भवती महिलांनी उपवास करणे टाळावे गरोदरपणाच्या काळात मातेसह तिच्या गर्भातील बाळाच्या वाढीसाठी योग्य प्रमाणात कॅलरीज आणि पोषक तत्त्वांची गरज असते. उपवासामुळे शरीरातील साखर, ऊर्जेची पातळी खालावू शकते, ज्याचा विपरीत परिणाम बाळाच्या विकासावर होऊ शकतो. त्यामुळे गर्भवती महिलांनी नवरात्रात उपवास करू नयेत. ज्यांना उपवासाची सवय त्यांनी निर्जल उपवासाला सुरुवात करू नये, किंवा आहार पूर्ण बंद न करता ८ दिवस आधी पासून आहाराचे प्रमाण हळूहळू कमी करावे. नऊ दिवसांचा उपवास संपल्यानंतर जड, मसालेदार अन्न न घेता हलक्या आहाराने सुरुवात करत जेवणाचे प्रमाण सावकाश वाढवावे. यामुळे पचनसंस्थेवर अतिरिक्त ताण येत नाही आणि आरोग्य सुरक्षित राहते. ^या नऊ दिवसांत उपवासाला योग, ध्यानाची जोड दिल्यास दुहेरी फायदा होतो. शरीराला हलका ताण देणारी, पीळ देणारी व लवचिकता वाढवणारी सोपी आसने करावीत. यामुळे चयापचय क्रिया वेगवान होऊन शरीरातील दूषित द्रव्ये बाहेर पडतात. हा काळ वजन नियंत्रित ठेवण्यासाठी , मानसिक ताण दूर करण्यासाठी उत्तम मानला जातो. योग्य पद्धतीचा आहार, सकारात्मक विचारांनी केलेला उपवास हा मनाची , शरीराची ऊर्जा कित्येक पटीने वाढवतो. डॉ. तक्षशिला ताकसांडे, आहारतज्ज्ञ योग आणि ध्यानाने वाढेल चैतन्य
Source link