![]()
तपोवन-विद्यापीठ परिसरात बिबट्याचा संचार वाढल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. बिबट्याच्या वावरामुळे मानवी जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याची मागणी भाकपच्या तपोवन-विद्यापीठ शाखे
.
यासंदर्भात भाकपच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांच्या प्रतिनिधी मंडळाने मनपा आयुक्तांची भेट घेऊन निवेदन सादर केले. तपोवन परिसरातील विद्यापीठ चौक ते तपोवन संस्था या मार्गावर पथदिव्यांची व्यवस्था अपुरी असल्याने रात्री नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ चौक ते तपोवन संस्थेदरम्यानच्या रस्त्यावर कमी अंतरावर हाय पॉवर पथदिवे लावावेत, नाल्याच्या दोन्ही बाजूंना हॅलोजन दिव्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी निवेदनातून केली. रात्री पुरेसा प्रकाश राहिल्यास नागरिकांना ये-जा करणे सुलभ होईल, वन्यप्राण्यांच्या हालचाली लक्षात येण्यास मदत होईल, अशी भूमिका प्रतिनिधी मंडळाने मांडली. नागरिकांच्या सह्यांसह हे निवेदन मनपा आयुक्तांना दिले.
या वेळी प्रतिनिधी मंडळाने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मांडत उपाययोजनाबाबत चर्चा केली. या प्रतिनिधी मंडळात सुशील ढोले, अशोकराव राऊत, अशोक सोनारकर, आयटकचे जिल्हाध्यक्ष जे. एम. कोठारी, लता सोनारकर, भाकपचे अमरावती तालुका सचिव निळकंठ ढोके सुमेध पुडके, हिरामन गावंडे, जगदीश तायडे, ढोणे साहेब, मनीष सोनोने, श्री. रामटेके, श्याम बोडखे उपस्थित होते. सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर पोहरा बंदी अभयारण्य परिसरातून विद्यापीठ तलाव, विद्यापीठ नाला आणि तपोवन परिसरातील नाल्याच्या मार्गाने बिबट्या या भागात येत असल्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली आहे. त्यामुळे अनेकदा बिबट्या नागरिकांच्या नजरेस पडत असून, परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.या मार्गावरील नाल्याच्या परिसरातून बिबट्याची ये-जा होत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.