“जोपर्यंत नरेंद्र मोदींच्या हुकूमशाहीचा अंत होत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील. आम्ही लवकरच पुन्हा रस्त्यावर उतरू,” असा थेट इशारा कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिला आहे. नुकत्याच झालेल्या अटकेच्या कारवाईनंतर माध्यमांशी संवा
.
महिला पोलिसांचा ढाल म्हणून वापर
अटकेच्यावेळी महिला पोलिसांना पुढे करण्याच्या पोलिसांच्या रणनीतीवर दिपके यांनी टीका केली. ते म्हणाले, “पुरुष पोलिस अधिकाऱ्यांनी जे गैरवर्तन केले आहे, त्याची दिल्ली पोलिसांना लाज वाटली असावी, म्हणूनच त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी महिला पोलिसांना पुढे केले. आमच्याकडून चुकून काही घडले तर आम्ही महिला पोलिसांसोबत गैरवर्तन करतोय, असे त्यांना दाखवायचे होते. पण आम्ही दिल्ली पोलिसांसारखे गुंड नाही, आम्ही सुशिक्षित आहोत आणि महिलांना आदराने कसे वागवायचे हे आम्हाला चांगले माहीत आहे.”

रात्री साडेतीन वाजता अटकेचे वॉरंट
दिल्ली पोलिसांनी कायदेशीर अधिकारांचे उल्लंघन केल्याचा दावा करत दिपके म्हणाले, “मला वकिलाशी किंवा भावाशी बोलू दिले नाही. पोलिसांनी हिंमत असेल तर माझा पूर्ण अनएडिटेड व्हिडिओ समोर आणावा. त्यांनी माझा पत्ता किंवा ठाणे संपूर्ण दिवस माझ्या वकिलांना किंवा घरच्यांना सांगितले नाही. माझ्या आजीचे निधन झालेले असतानाही, पोलिसांनी रात्री साडेतीन वाजता माझ्याकडे अटकेचे पेपर आणले आणि ‘तू आता दीर्घकाळ जेलमध्ये जाणार आहेस, लवकर यावर सही कर आणि तुझ्या आई-वडिलांना फोन करून सांग,’ असा दबाव टाकला. हा माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या मानसिक छळाचाच प्रकार होता.”
‘देवेंद्र फडणवीस इतके दिवस झोपले होते का?’
राज्यातून हद्दपार करण्याच्या मुद्द्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर अभिजीत दिपके संतापले. “मला राज्यातून हद्दपार करायला… मी सरकारमध्ये बसलोय का? सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस बसलेले आहेत… मग ते इतके दिवस झोपलेले होते का?” असा सवाल करत त्यांनी राज्य सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला.
————
हेही वाचा..
विरोधकांचा आज CEC विरोधात SC पर्यंत मार्च: 6 मेट्रो स्टेशन बंद; सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा राहुल गांधी, खरगेंना भेटण्यास नकार

मतदानात फेरफार झाल्याच्या आरोपांविरोधात निषेध नोंदवण्यासाठी काँग्रेस आणि ‘इंडिया’ (INDIA) आघाडीतील इतर पक्षांसह विरोधी पक्ष आज सर्वोच्च न्यायालयाकडे मोर्चा काढणार आहेत. काँग्रेसने या निदर्शनाला ‘चलो दिल्ली – लोकशाहीसाठी मोर्चा’ (Chalo Delhi – March for Democracy) असे नाव दिले आहे. विरोधी पक्षांचे नेते दुपारी १:३० वाजता कनॉट प्लेस-बाराखंबा रोड जंक्शनवर एकत्र जमणार आहेत.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवेदन सादर करण्यासाठी सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांची भेट घेण्याची विनंती रविवारी केली होती, परंतु सरन्यायाधीशांनी ही भेट नाकारली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरन्यायाधीशांनी सांगितले की, अशाच प्रकारचे मुद्दे आधीच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. भेटीची विनंती फेटाळल्यानंतर काँग्रेसने म्हटले की, ते या निर्णयाचा आदर करतात, तरीही ते आपला मोर्चा काढतील. सविस्तर वाचा