![]()
पुण्यात सायबर चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन महिलांची फसवणूक केली आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका महिलेची 21 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक झाली, तर दुसऱ्या डॉक्टर महिलेचे 74 हजार रुपये लांबवले. ओैंधमधील 39 वर्षीय महिलेला चोरट्यांनी मोबाईलवर शेअर बाजारातील गुंतवणुकीचे संदेश पाठवले. चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून एका बँक खात्यात महिनाभरात 21 लाख 20 हजार रुपये जमा करण्यास सांगितले. पैसे जमा केल्यावर परतावा किंवा रक्कम परत मिळाली नाही. महिलेने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. बिबवेवाडी भागातील 62 वर्षीय डॉक्टर महिलेला ऑनलाइन कंपनीतून बोलत असल्याचे सांगून संपर्क साधण्यात आला. चोरट्याने त्यांच्या मोबाईलवर एपीके फाईल पाठवून एक ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. महिलेने ॲप डाउनलोड करून बँक खात्याची माहिती दिली. या माहितीचा गैरवापर करत चोरट्याने खात्यातून 74 हजार रुपये काढून घेतले. डॉक्टर महिलेने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. सायबर चोरट्यांकडून डॉक्टर महिलेची आर्थिक फसवणूक सायबर चोरट्यांनी बिबवेवाडी भागातील एका डॉक्टर महिलेची 74 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका डॉक्टर महिलेने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार 62 वर्षीय डॉक्टर महिला बिबवेवाडी भागातील श्री संत एकनाथनगर भागात राहायला आहे. सायबर चोरट्याने त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. ऑनलाइन वस्तू घरपोच देणाऱ्या कंपनीतून बोलत असल्याची बतावणी केली. त्यानंतर डॉक्टर महिला आणि त्यांच्या पतीच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्याने एपीके फाईल पाठविली. सायबर चोरट्याने त्यांना एक उपयोजन (ॲप) डाऊनलोड करण्यास सांगितले. डॉक्टर महिलेने हे ॲप मोबाइलमध्ये घेतले. बँक खात्याची माहिती त्यांनी त्यात दिली होती. या माहितीचा गैरवापर करुन चोरट्याने बिबवेवाडी भागातील एका बँकेच्या खात्यातून 74 हजार रुपये लांबविले. खात्यातून पैसे लांबविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सूरज बेंद्रे तपास करत आहेत.
Source link
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची फसवणूक:सायबर चोरट्यांनी 21 लाख 20 हजार रुपये लांबवले; चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल