Headlines

राष्ट्रीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत आनंदी साळुंखे हिची चमकदार कामगिरी




छत्तीसगडमधील भिलाई येथे ३ ते ७ ऑक्टोबरदरम्यान पार पडलेल्या राष्ट्रीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत महाराष्ट्र संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. संघाने तृतीय क्रमांक पटकावला. या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करण्याचा मान अकोल्यातील राजेश्वर कॉन्व्हेंटच्या प्रतिभावान खेळाडू आनंदी साळुंखे हिला मिळाला. राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेच्या स्पर्धेत आनंदी साळुंखे हिने अप्रतिम आत्मविश्वास, उत्कृष्ट क्रीडा कौशल्य, शिस्त, संघभावना यांचे दर्शन घडवले. संघाच्या विजयात तिने मोलाची भूमिका बजावली. सातत्यपूर्ण सराव, कठोर मेहनत, जिद्दीच्या बळावर तिने ही उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. राष्ट्रीय पातळीवर झेप घेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शाळेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुजी मेहरे, अध्यक्ष नंदकिशोर मेहरे, सचिव वैभव मेहरे, संचालक कांचन पटोकर, मुख्याध्यापिका सरिता वरणकर, क्रीडा शिक्षक अभिजीत गोमासे, लखन गोतरकर, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी आनंदी साळुंखेचे अभिनंदन केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *