छत्रपती संभाजीनगर शहराचे ग्रामदैवत असलेल्या कर्णपुरा येथील श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. कर्णपुरा मंदिर संस्थापक अध्यक्ष तथा आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते सकाळी सात वाजता घटस्थापना करण्यात आली. पारंपरिक
.

तब्बल 350 वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या मंदिरात नवरात्रोत्सवाच्या काळात राज्याच्या विविध भागांतून हजारो भाविक दर्शनासाठी येतात.

नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवानिमित्त कर्णपुरा मैदानावर भव्य यात्राही भरते. राज्यातील शेतकऱ्यांवर आलेले संकट दूर व्हावे, शेतकरी बांधवांना सुखाचे दिवस यावेत आणि सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदावी, यासाठी अंबादास दानवे यांनी आई तुळजाभवानीच्या चरणी साकडे घातले.

कर्णपुरा यात्रा बंदोबस्त
पोलिस उपायुक्त 01, सहायक पोलिस आयुक्त 01, पोलिस निरीक्षक 06, सपोनि./पोउपनि. 25 (20 + 05), पोलिस अंमलदार 250, महिला अंमलदार 75.
याशिवाय अतिरिक्त राखीव बंदोबस्तात 03 सपोनि./पोउपनि. आणि 30 अंमलदार तैनात.
दुष्काळातही यंदा बचतीमुळे उत्साह
“भारतीय समाजात बचतीची मोठी परंपरा आहे. प्रत्येक जण बचतीवर भर देतो. त्यामुळे दुष्काळ असला तरीही बचत करून ठेवलेली रक्कम प्रत्येकाकडे आहे. सणोत्सवात परंपरा पाळण्याचा पायंडा असल्याने सण चांगला करण्यासाठी ही रक्कम बाजारात येईल. यामुळे यंदाचा उत्सवही चांगला होईल. – संजय कांकरिया, जिल्हा व्यापारी महासंघ.
यंदाचा हंगाम चांगला जाण्याची शक्यता
“कपडा बाजारात मोठा उत्साह आहे. नवरात्रीत गरबा खेळण्यासोबतच दसऱ्यासाठी विशेष खरेदी होत आहे. यासाठी आम्ही तीन महिन्यांपासून तयारी केली होती. त्यामुळे हा हंगाम अत्यंत चांगला जाईल, असा आमचा अंदाज आहे.” – युसूफ मुकाती, व्यापारी
हे ही वृत्त वाचा
उदे गं अंबे उदे…:श्रीकृष्ण-जांबुवंत युद्ध, कोल्हापूरच्या अंबाबाईचे उपपीठ ते महालक्ष्मीचे प्रकटीकरण; जाणून घ्या कडेठाणच्या मंदिराची अनोखी गाथा

महाराष्ट्रात आदिमायाशक्तीची साडेतीन शक्तिपीठे आहेत. त्यातले कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानी माता आणि माहूरची (नांदेड) रेणुका माता ही तीन पूर्णपीठे, तर वणी (नाशिक) येथील सप्तशृंगी माता अर्धपीठ म्हणून ओळखले जाते. अगदी त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरपासून अवघ्या 44 किलोमीटवर असणारी कडेठाणची महालक्ष्मी माता हे कोल्हापूरच्या अंबाबाईचे उपपीठ म्हणून ओळखले जाते. वाचा सविस्तर