बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी सकाळी 9 वाजता मतदानाचा हक्क बजावला. संचालक
.
सुनेत्रा पवार म्हणाल्या की, आजचा दिवस अत्यंत शुभ आहे. आजपासून नवरात्र उत्सव सुरू होत आहे. सर्वांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आज सोमेश्वर सहकारी कारखान्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडत असून मी आताच मतदान केले आहे. ज्या उत्सहात आणि ज्या संख्येने लोकं आले आहेत त्यामुळे विजय निश्चित आहे हे आजच जाणवते आहे.
पुरुषोत्तम जगतापांची बंडखोरी
या निवडणुकीत तिरंगी आणि अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने राजकीय वर्तुळाचे याकडे विशेष लक्ष लागले आहे. कारखान्याच्या 21 जागांसाठी तब्बल 83 उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (सुनेत्रा पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि राष्ट्रवादीतून बंडखोरी करत पुरुषोत्तम जगताप यांनी भाजपच्या सहाय्याने उभे केलेले पॅनल, अशी ही प्रमुख लढत होत आहे.
पैसे वाटपाचे गंभीर आरोप; विजयाचा दावा
दरम्यान, शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष आणि उमेदवार राजेंद्र जगताप यांनी प्रतिस्पर्धी पॅनेल्सवर गंभीर आरोप केले आहेत. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी आणि पुरुषोत्तम जगताप यांच्या पॅनलने निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैसे वाटप केले, असा आरोप जगताप यांनी केला. मात्र, असे असले तरी सभासदांचा आपल्यालाच पाठिंबा असून आमचा विजय निश्चित आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
सोमेश्वरची निवडणूक बनली प्रतिष्ठेची
पवार कुटुंबातील राजकीय संघर्ष आणि पुरुषोत्तम जगताप यांचे स्वतंत्र आव्हान यामुळे सोमेश्वर कारखान्याची ही निवडणूक कमालीची प्रतिष्ठेची आणि चुरशीची बनली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांच्या या आरोप-प्रत्यारोपानंतर आता सभासद नेमका कोणाच्या पदरात कौल देतात, हे उद्या लागणाऱ्या निकाला स्पष्ट होणार आहे.
हे ही वृत्त वाचा ‘आमच्याशिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही’:युगेंद्र पवारांचा दावा; सोमेश्वर साखर कारखान्यात तिरंगी लढत

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली ‘श्री सोमेश्वर शेतकरी विकास पॅनेल’ निवडणूक लढवत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची जर इच्छाच नसेल तर आपण काय करू शकतो. या कारखान्यात तिरंगी लढत होत आहे. कुणालाच काय सांगता येणार नाही, पण आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरवला जाणार नाही. वाचा सविस्तर