Headlines

Navnath Ban Slams Rohit Pawar Over Pune Student Protest Controversy


पुण्यात सुरू असलेले आंदोलन विद्यार्थ्यांचे नसून ते पूर्णपणे आमदार रोहित पवारांसाठी चालवलेली ‘नौटंकी’ आहे. महायुती सरकारला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्यासाठी हा राजकीय स्टंट सुरू असून, रोहित पवारांचा हरवलेला जनाधार पुन्हा मिळवण्या

.

नवनाथ बन म्हणाले, रोहित पवारांना स्वतः मुख्यमंत्री व्हायचे आहे आणि त्यासाठीच ते पैसे खर्च करून हे आंदोलन उभे करत आहेत. त्यांना खांद्यावर घेऊन नाचवले जात आहे. पुण्यातील या आंदोलनात विद्यार्थी कमी आणि रोहित पवारांची स्वतःची ‘गँग’ व त्यांचे कार्यकर्तेच जास्त आहेत. बारामती अ‍ॅग्रोचे सर्व पदाधिकारी आणि कर्मचारी तिथे आणले गेले आहेत.

रोहित पवारांकडून हडपसरसारख्या मतदारसंघाची चाचपणी

नवनाथ बन म्हणाले, कर्जत-जामखेड हा त्यांचा मूळ मतदारसंघ सोडून रोहित पवार आता पुण्यातील हडपसरसारखा मतदारसंघ आपल्याला मिळेल का, याची चाचपणी या आंदोलनाच्या माध्यमातून करत आहेत. त्यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात दुष्काळासंदर्भात महत्त्वाची बैठक झाली, तेव्हा मात्र त्यांनी तिकडे ढुंकूनही पाहिले नाही, अशी आठवणही बन यांनी करून दिली. विद्यार्थ्यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्यावरही जाणीवपूर्वक काही लोकांना धमकावून आंदोलनाला बसवले जात असल्याचा दावा त्यांनी केला.

अर्ध्या हळकुंडानं पिवळं होऊ नये

नवनाथ बन म्हणाले की, विवेकानंद पाटील माजगावकर यांनी अर्ध्या हळकुंडानं पिवळं होऊ नये! तुमच्या पाठीशी रोहित पवार असतील, तर माझ्या पाठीशी वारकरी परंपरा आहे. मी वारकऱ्याचा पोरगा असून अध्यात्माचे हे वेड मला आज लागलेलं नाही, तर लहानपणापासूनचे आहे. वाटल्यास 3-4 वर्षांपूर्वीचा माझा कीर्तनाचा व्हिडिओ कान उघडे ठेवून ऐका आणि यातलं काही रोहित पवारांना कळतं का, ते सांगा.विवेकानंद यांनी आपल्या ज्ञानाचा अहंकार बाळगू नये, असा इशारा देत नवनाथ बन यांनी रोहित पवार आणि विवेकानंद पाटील यांना एक थेट प्रतिप्रश्न करत अभ्यासाचे आव्हानही दिले आहे.

हे ही वृत्त वाचा

पुण्यात एसआयआरविरोधी आंदोलन चिघळले, 88 जण ताब्यात:लष्कर पोलिस ठाण्याबाहेर समर्थकांचे आंदोलन, ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांचा ठाण्यात निषेध

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (एसआयआर) प्रक्रियेला आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी पुण्यात शनिवारी (१० ऑक्टोबर) आंदोलन करण्यात आले. लाल महाल चौक आणि शनिवारवाडा परिसरात जमलेल्या सीजेपीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने वातावरण तापले. ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना लष्कर पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर पोलिस ठाण्याच्या आत विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले, तर बाहेर समर्थकांनी घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.