![]()
प्रतिनिधी | करमाड मावस बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या रिक्षाचालकावर काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना जालना-छत्रपती संभाजीनगर मार्गावर घडली. तुलसी हॉटेलजवळ बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची आठ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली. सटाणा येथील राजू जिजा जगधने (३५) हे आपल्या रिक्षातून कौडगाव येथे मावस बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमाला जात होते. तुलसी हॉटेलजवळ पुढे उभ्या असलेल्या अज्ञात वाहनाला त्यांच्या रिक्षाने पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत जगधने यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची मुलगी तनुजा (८) गंभीर जखमी झाली. अपघातानंतर जखमींना तातडीने ॲम्ब्युलन्सद्वारे घाटी रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून जगधने यांना मृत घोषित केले असून तनुजावर उपचार सुरू आहेत.
Source link
अपघातात रिक्षाचालक ठार, मुलगी गंभीर जखमी:जालना-छत्रपती संभाजीनगर मार्गावर हृदयद्रावक घटना