Headlines

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राकडून मदतीची आशा; वर्षा बंगल्यावर बैठक पार:राज्याच्या दुष्काळी अहवालावर सकारात्मक प्रतिसाद- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे




महाराष्ट्रात सध्या सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान तर झाले आहेच पण तोंडाशी आलेला घासही या दुष्काळाने हिरावला आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर केला असून पंचनामे देखील सुरू केले आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाने देखील राज्यात अनेक ठिकाणी पाहणी केली. या पाहणी दौऱ्यानंतर आज वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. या संदर्भातील माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, सोलापूर आणि अहिल्यानगर भागामध्ये केंद्राच्या पहिल्या पथकाने दौरा केला, दुसऱ्या पथकाने जालना, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर या भागातील शेतकऱ्यांच्या पिकांच्या परिस्थितीची पाहणी केली. आणि तिसऱ्या पथकाने विदर्भात वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये त्यांनी पाहणी केली आहे. साधारण 65 गावांमध्ये जाऊन त्यांनी पिक परिस्थितीची माहिती घेतली आणि त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत, जनावरांच्या चाऱ्याच्या बाबतीत माहिती घेतली आणि माहिती घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली. पुढे बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले, आपण जो राज्याने या दुष्काळ परिस्थितीचा जो आपण आपला अहवाल जो सादर केलेला आहे, त्याबाबतीत आपल्या ज्या बाबी आपण नमूद केल्या होत्या, त्यावर केंद्रीय पथकाने सकारात्मकता दाखवली आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला माहीत आहे की याबाबतीत राज्य सरकारच्या वतीने काय काय नियोजन केले आहे याची माहिती दिली आणि केंद्राकडून जास्तीत जास्त कशी मदत मिळवता येईल या संदर्भात केंद्रीय कृषिमंत्र्यांसोबत चर्चा केली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मदत करू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. तसेच शेती सोबतच पिण्याचे पाणी, पशुधन वाचवण्यासाठी, चारा असेल आणि पिण्याच्या पाण्यापासून योग्य नियोजन आपण करत आहोत. तसेच यात केंद्राकडून जास्तीत जास्त मदत मिळावी अशी चर्चा आजच्या बैठकीत झाल्याची माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *