Headlines

Admin

हिमाचलमध्ये तरुणीचा गळा चिरून खून, आरोपीला अटक:ग्रामस्थांनी लाठी-काठ्यांनी मारहाण केली, नशेत गुन्हा केल्याची शक्यता, कॉलेजला जाताना हल्ला

हिमाचल प्रदेशातील मंडी येथे सोमवारी सकाळी एका 19 वर्षीय तरुणीचा गळा आणि हात कापून खून करण्यात आला. कृत्य केल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी साडेतीन तासांनी अटक केली. त्यापूर्वी ग्रामस्थांनी लाठी-काठ्यांनी आरोपीला बेदम मारहाण केली. पोलिसांनी त्याला घटनास्थळापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर ग्रामस्थांच्या मदतीने जंगलात पकडले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे. आरोपी…

Read More

ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भोईटे यांचे निधन:वयाच्या 60 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; पुणे श्रमिक पत्रकार संघाचे होते माजी अध्यक्ष

ज्येष्ठ पत्रकार प्रकाश ज्ञानेश्वर भोईटे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. ते पुणे श्रमिक पत्रकार संघाचे आणि पत्रकार प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष होते. वयाच्या 60 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, वडील, तीन भाऊ आणि पुतणे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी रात्री पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील कोथळे येथे अंत्यसंस्कार करण्यात…

Read More

धुरंधर 2 ने 25 दिवसांत ₹1712 कोटी कमावले:परदेशात ₹415 कोटी कमावले; पुष्पा 2 चा वर्ल्डवाइड रेकॉर्ड मोडण्यापासून ₹30 कोटी दूर

रणवीर सिंग अभिनित ‘धुरंधर द रिवेंज’ हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहे. चित्रपटाला प्रदर्शित होऊन 26 दिवस झाले आहेत आणि चौथ्या आठवड्यानंतरही त्याची कमाई मजबूत आहे. सॅकनिल्कनुसार, हा चित्रपट आता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2: द रूल’ च्या जगभरातील कमाईचा विक्रम मोडण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. 25व्या दिवसापर्यंत धुरंधर 2 चे जगभरातील एकूण कलेक्शन 1,712.98…

Read More

'जीवलगा' गाताना नेसली होती फाटकी साडी:शांता शेळके यांनी उलगडले आशाताईंच्या स्वभावाचे अनोखे पैलू, पुस्तकातून सांगितलेले अनेक किस्से

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने संगीत विश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी आशाताईंच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. आशाताईंच्या निधनानंतर अनेकांनी त्यांच्याविषयीचे किस्से तसेच आठवणींना उजाळा दिला आहे. ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांनी ‘स्वरस्वामिनी आशा’ या पुस्तकातून आशाताईंच्या स्वभावावर भाष्य करत त्यांचे अनेक किस्सेही सांगितले आहेत….

Read More

भोंदू खरातला 1825 बड्या आसामींचे कॉल:नावे ऐकूण हादरा बसेल, अंजली दमानिया यांचा दावा; बुधवारी करणार मोठा खुलासा

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणात दोन दिवसांत मोठा खुलासा करण्याची ग्वाही दिली आहे. भोंदू अशोक खरातला 1825 मोठ्या आसामींचे कॉल आले होते. यात राकारणी, आयजी व तहसीलदारांसह अनेकांची नावे आहेत. त्यांची नावे ऐकूण सर्वांनाच हादरा बसेल. मी या प्रकरणी दोन दिवसांत मोठा खुलासा करेल, असे त्या म्हणाल्यात. भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे…

Read More

40 वर्षांच्या सरकारी शिक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू:बंद घरात मृतदेह आढळला, दुर्गंधी आल्यावर गावकऱ्यांनी पोलिसांना बोलावले

40 वर्षांच्या सरकारी शिक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. भाड्याच्या बंद घरातून दुर्गंधी येत असल्याने गावकऱ्यांनी पोलिसांना बोलावले. घराचे मुख्य गेट उघडल्यावर पोलीस आत पोहोचले तेव्हा एका खोलीत बेडवर मृतदेह पडलेला आढळला. शिक्षकाचा दोन दिवसांपूर्वीच मृत्यू झाला होता. हे संपूर्ण प्रकरण पाली जिल्ह्यातील सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दयालपुरा गावातील आहे. 12 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या…

Read More

आनंदोत्सव, घरांवर विद्युत रोषणाई, निळे झेंडे, लेक-जावयांचे आगमन:पुरणपोळीचा बेत, नवीन कपडे, लाडू, चकली, करंजी फराळाची तयारी, घराची रंगरंगोटी, आकाश कंदीलचा झगमगाट‎

प्रतिनिधी | सोलापूर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मंगळवारी (ता. १४ ) साजरी होत आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्यास सुशोभीकरण, रोषणाई करण्यात आली आहे. सोमवारी मध्यरात्री बारानंतर असंख्य अनुयायी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ नतमस्तक होण्यासाठी येतात. न्यू बुधवार पेठ, मिलिंद नगर, माता रमाबाई आंबेडकर नगर, मुकुंद नगर, फॉरेस्ट, कुमठा नाका, हब्बूवस्ती आदी परिसरातील घरात सफाई, रंगरंगोटीचे…

Read More

बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकालाच विलंब का?:युद्धाचे कारण पुढे करून इंदू मिलमधील स्मारकाच्या कामाला मुदतवाढ -विजय वडेट्टीवार

आखातातील युद्धामुळे मुंबईतील इंदू मिलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम आणखी वर्षभर लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी सरकारवर निशाणा साधत सरकार महामानवांच्या विचारांप्रती अनास्था का बाळगत आहे? असा सवाल केला आहे. आखात इराण विरुद्ध अमेरिका – इस्त्रायल युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे तांबे व स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा निर्माण झाला…

Read More

भोंदू अशोक खरातकडे जाणाऱ्या महिलांना पोलिसांत का जावे वाटले नाही?:व्यवस्थेत काम करणारे आम्ही सर्वजण अपयशी ठरलो – सुप्रिया

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणात व्यवस्था म्हणून आम्ही सर्वजण अपयशी ठरल्याची खंत व्यक्त केली आहे. भोंदू अशोक खरातकडे जाणाऱ्या महिलांना पोलिसांकडे का जाऊ वाटले नाही? यावरून एक व्यवस्था म्हणून व व्यवस्थेत काम करणारे लोक म्हणून आम्ही सर्वजण अपयशी ठरल्याचे सिद्ध होते. या प्रकरणी सत्ताधारी व विरोधक या…

Read More

सर्वोच्च न्यायालयाने बंगाल SIR वर प्रश्न उपस्थित केले:EC ला विचारले- विजयाचे अंतर 2% आणि 15% लोक मतदान करू शकले नाहीत तर काय होईल?

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी SIR वर सुनावणी केली. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांनी निवडणूक आयोगाला विचारले की, जर निवडणुकीच्या निकालांमध्ये विजयाचे अंतर 2% असेल आणि 15% लोक मतदान करू शकले नाहीत तर काय होईल. न्यायालयाने असेही म्हटले की, मतदार अधिकाऱ्यांमध्ये भरडला जात आहे. हा एकमेकांवर दोषारोप करण्याचा खेळ नाही….

Read More