Headlines

Admin

सुनेत्रा पवारांची तक्रार, देवेंद्र फडणवीसांनी घेतली तातडीने दखल:महापालिका रचनेत फेरबदल की राजकीय डाव? राजकारण तापलं

पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या नव्या रचनेवरून राज्यातील राजकारणात नव्याने खळबळ उडाली आहे. बारामतीतील पोटनिवडणुकीची पार्श्वभूमी असतानाच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र पाठवून गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. महापालिकेने केलेल्या बदलांमुळे काही प्रभागांतील प्रतिनिधित्वावर परिणाम होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या तक्रारीमुळे प्रशासन आणि राजकारण या दोन्ही स्तरांवर चर्चा सुरू झाली…

Read More

भोंदू अशोक खरातसोबत राजकीय नेत्यांचेही व्हिडिओ:हे सर्व उघडपणे समोर यायला हवे, आमदार रोहित पवारांची मागणी

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याने अनेक महिलांवर केलेले लैंगिक अत्याचार आणि त्याचे समाजमाध्यमांवर व्हायरल झालेले संतापजनक व्हिडिओ यामुळे संपूर्ण राज्यात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, या गंभीर प्रकरणाची आता एसआयटी मार्फत सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचे पडसाद राजकीय वर्तुळातही मोठ्या प्रमाणावर उमटत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी यासंदर्भात…

Read More

रिक्षाचालकांसाठी मराठी सक्तीच्या निर्णयावरून बिष्णोई गँगची उघड धमकी:RTO अधिकाऱ्याला धमकीने खळबळ

मुंबईत रिक्षाचालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या प्रस्तावामुळे निर्माण झालेला वाद आता अधिकच गंभीर वळणावर पोहोचला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा चालवण्यासाठी मराठी भाषा येणे आवश्यक असल्याचे जाहीर केल्यानंतर मराठी विरुद्ध अमराठी असा वाद पुन्हा एकदा पेटला आहे. या पार्श्वभूमीवर आता गुन्हेगारी जगतातील बिष्णोई गँगने थेट हस्तक्षेप करत मिरा-भाईंदरमधील RTO अधिकाऱ्याला धमकी दिल्याची माहिती…

Read More

पती-पत्नी, 3 महिन्यांच्या मुलाचा जिवंत जळून मृत्यू:काडी पेटवताच गॅस सिलिंडरचा स्फोट झाला; 4 वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता

बिहारमधील दरभंगा येथे पती-पत्नी आणि 3 महिन्यांच्या बाळाचा जिवंत जळून मृत्यू झाला. पत्नी स्वयंपाक करण्यासाठी स्वयंपाकघरात गेली असताना हा अपघात घडला. तिने गॅस चालू केला आणि काडीपेटी पेटवली. काडीपेटी पेटवताच स्वयंपाकघरात जोरदार स्फोट झाला. महिलेच्या मांडीवर बाळही होते. दोघेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. पतीही पत्नी-बाळाला वाचवण्यासाठी धावत आगीत घुसला. तिघांचाही जळून मृत्यू झाला. मृतांची ओळख गोविंद…

Read More

बिल्डरांच्या गैरव्यवहाराची चौकशी सुरू; महसूल मंत्र्यांचा कडक इशारा:एसआयटीच्या चौकशीने बिल्डर लॉबी हादरली; फौजदारी कारवाईचे आदेश

नाशिकमधील गृहनिर्माण क्षेत्रात उघड झालेल्या कथित म्हाडा घोटाळ्याने राज्यभरात खळबळ उडवली असून आता या प्रकरणात मोठी कारवाई सुरू झाली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटासाठी राखीव असलेल्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे समोर आल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय विशेष…

Read More

'माझा भाऊ इथं आयजी, त्याला धर्मसंकटात नाही टाकायचं':विश्वास नांगरे पाटलांनी दिला आशाताईंच्या आठवणींना उजाळा

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे मुंबईतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले असून, त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रासह संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी आशाताईंच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. भारतरत्न सचिन तेंडुलकरने अंत्यदर्शनावेळी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली, तर आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनीही गेल्याच आठवड्यात…

Read More

पहिल्यांदाच AI ने बनली ₹17,000 कोटींची कंपनी:फक्त दोन भाऊ काम सांभाळतात; सॅम ऑल्टमनची 1 अब्ज डॉलरची भविष्यवाणी खरी ठरली

लॉस एंजेलिसमध्ये राहणाऱ्या 41 वर्षीय मॅथ्यू गॅलाघरने AI च्या मदतीने ₹17 हजार कोटींची कंपनी तयार केली. कंपनीचे नाव मेडली आहे, जी बनवण्यासाठी फक्त दोन महिने आणि 18 लाख रुपये खर्च झाले आहेत. मेडवी एक टेलीहेल्थ स्टार्टअप आहे जो वजन कमी करणाऱ्या औषधांची ऑनलाइन विक्री आणि सल्ला देतो. ही कंपनी चर्चेत आहे कारण या कंपनीचा वार्षिक…

Read More

राज्य मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय जाहीर:विकसित महाराष्ट्र 2047 कडे मोठी झेप;भरतीपासून आरोग्य, शिक्षण ते विकासाला मोठी चालना

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत सोमवारी अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली. विकसित महाराष्ट्र 2047 या व्हिजनला अनुसरून विविध क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेषतः शासन सेवेतील भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यावर भर देण्यात आला असून, यामुळे भविष्यातील प्रशासन अधिक कार्यक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शासन सेवेतील पदभरती प्रक्रियेत मोठे…

Read More

आग्रामध्ये भाजप नेत्याचा डान्सरसोबत व्हिडिओ:हॉटेलच्या खोलीत दिसले, अधिकारी बनून वसुलीसाठी धमकावले

आग्रामध्ये नेते महिपाल चौधरी यांचा हॉटेलमध्ये डान्सरसोबतचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ हॉटेलच्या खोलीतील आहे. ज्यात स्पष्ट दिसत आहे की महिपाल चौधरी खुर्चीवर बसलेले आहेत. खोलीत दोन बारबाला नाचत आहेत. यापूर्वी, 6 एप्रिल रोजी महिपालने स्वतःला अधिकारी सांगून एका हॉटेल मालकाला आणि कर्मचाऱ्यांना धमकावले होते. त्यानंतर त्यांच्याकडून 2 लाख रुपयांची खंडणीही मागितली होती. त्यानंतर…

Read More

ईको कार – सिमेंट मिक्सर ट्रकची समोरासमोर धडक:कारमधील 8 जण जागीच ठार, 1 गंभीर; कल्याण – नगर महामार्गावरील भयंकर घटना

कल्याण – अहिल्यानगर महामार्गावर सोमवारी सकाळी ईको कार व सिमेंट मिक्सर ट्रकचा एक भयंकर अपघात झाला आहे. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेत तब्बल 8 प्रवाशी ठार झाले असून, 1 जण गंभीर जखमी झाला आहे. सध्या पोलिस मृतांची ओळख पटवण्याचे काम करत आहेत. तर जखमीला लगतच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तिथे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती…

Read More