Headlines

एकनाथ शिंदेंनी घेतली अमित शहांची भेट, 45 मिनिटे बैठक:विकासकामांसाठी निधीचे आश्वासन, उद्या शिंदेंची पत्रकार परिषद




दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उद्धव ठाकरे गटाला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केलेल्या सहा खासदारांनी आज थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीत खासदारांच्या मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे आणि केंद्राच्या निधीबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी अमित शाहांनी या सर्व खासदारांना विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नाही, असा शब्द दिला आहे. ४५ मिनिटांची बैठक आणि विकासकामांवर मंथन अमित शहा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी तब्बल पाऊण तास ही महत्त्वाची बैठक चालली. या बैठकीचे नेतृत्व स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले, तर शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेदेखील आवर्जून होते. ‘उबाठा’ गटातून शिवसेनेत आलेल्या या सहाही खासदारांच्या आपापल्या मतदारसंघांतील प्रलंबित विकासकामांना गती कशी देता येईल, यावर या बैठकीत अत्यंत सकारात्मक आणि सखोल चर्चा करण्यात आली. केंद्राकडून निधीची कमतरता नाही; शाहांची ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बैठकीला आलेल्या या सर्व खासदारांचे स्वागत केले. केंद्राच्या अखत्यारीत असणारे विविध मोठे प्रकल्प, आवश्यक असणारा निधी आणि मतदारसंघातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळावी, अशी मागणी या खासदारांनी शाहांकडे केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत, लोककल्याणकारी योजना आणि विकासकामांसाठी केंद्र सरकारकडून निधी किंवा इतर कोणत्याही मदतीची अजिबात कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही अमित शहा यांनी या खासदारांना दिली. ‘पावसासोबतच चांगल्या गोष्टींची सुरुवात’ या सदिच्छा भेटीनंतर बाहेर आल्यावर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी एक अतिशय सूचक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, संसदेचे पावसाळी अधिवेशन आता सुरू होत आहे आणि ही आपल्या सर्वांसाठी एक अतिशय चांगली गोष्ट आहे. योगायोगाने आज दिल्लीत चांगला पाऊसही पडला आहे. त्यामुळे या पावसामुळे दिल्लीत अतिशय सकारात्मक वातावरणात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. उद्याच्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष अमित शाह यांच्यासोबत झालेल्या या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीनंतर, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या (बुधवारी) दिल्लीतच एक विशेष पत्रकार परिषद घेणार आहेत. शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत नेमकी काय राजकीय खलबते झाली? तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे या पत्रकार परिषदेतून काही मोठे संकेत देणार का? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे आणि राजकीय जाणकारांचे लक्ष लागून राहिले आहे. हेही वाचा.. शेतकऱ्यांना मोठा दिलासा ते ST बसस्थानकांचा कायापालट:फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय राज्यातील शेतकरी, पायाभूत सुविधा आणि शहरी विकासाला मोठी गती देण्यासाठी राज्य सरकारने आज महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 14 जुलै रोजी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 अत्यंत महत्त्वाचे आणि राज्याचा चेहरामोहरा बदलणारे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. राज्यातील कृषी क्षेत्राला बळकटी देणे, शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणातून बाहेर काढणे आणि राज्यातील पायाभूत सुविधांचा विकास करणे हे राज्य सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे, महायुती सरकारने याच धोरणावर भर दिला आहे. विशेषतः शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून कर्जमाफीच्या निकषांमध्ये केलेले बदल आणि एसटी महामंडळाच्या जागांचा विकास करण्याचे निर्णय राज्याच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारे ठरणार आहेत. सविस्तर वाचा..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *