पोलिस दलास 3 आधुनिक सर्व्हिलन्स वाहने:कायदा, सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर तत्काळ नियंत्रण ठेवणे आता हाेणार शक्य
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अकोला पोलिस दलाच्या ताफ्यात अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त ३ सर्व्हिलन्स वाहने नव्याने समाविष्ट करण्यात आली आहेत. या वाहनांचा शुभारंभ ७ एप्रिल रोजी पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. या सर्व्हिलन्स वाहनांच्या माध्यमातून शहरातील संवेदनशील भाग, गर्दीची ठिकाणे, मोर्चे, धार्मिक कार्यक्रम, उत्सव, तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी प्रभावी…