Headlines

Admin

उमरदरी शिवारात तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटली:लोणार येथील तरुणाचा मृतदेह असल्याचे स्पष्ट, खूनाचे नेमके कारण शोधण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू

सेनगाव तालुक्यातील उमरदरी शेत शिवारात बुधवारी तारीख 8 सकाळी मृत अवस्थेत आढळून आलेल्या तरुणाची ओळख पटली असून सदर मृतदेह विदर्भातील लोणार येथील सचिन राजगुरू या तरुणाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर आता पोलिसांनी त्याच्या खुनाचे नेमके कारण शोधण्याची प्रयत्न सुरू केले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेनगाव तालुक्यातील उमरदरी फाट्याजवळ एक अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला. सदर…

Read More

आसाम,केरळ,पुदुच्चेरीत विधानसभा निवडणुकीसाठी मतदान संपले:अँटनी म्हणाले- केरळात भाजप कुणाला आवडत नाही; पुदुच्चेरीत कांग्रेस-भाजप समर्थक भिडले

आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी येथील विधानसभा निवडणुकांसाठीचे मतदान आज सायंकाळी ६ वाजता संपले. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, सायंकाळी ५ वाजेपर्यंत आसाममध्ये ८४.४२%, केरळमध्ये ७५.०१% आणि पुद्दुचेरीमध्ये ८६.९२% मतदानाची नोंद झाली. पुद्दुचेरीमध्ये, मन्नादिपेट येथील एका मतदान केंद्रावर काँग्रेस आणि भाजपच्या समर्थकांमध्ये संघर्ष उफाळून आला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री एन. रंगसामी हे मतदान करण्यासाठी दुचाकीवरून…

Read More

शरद पवारांचा काँग्रेसला सल्ला:बारामतीची जागा अपघाताने रिक्त झाली, निवडणूक बिनविरोध व्हावी; शेवटच्या दिवशी निर्णायक क्षण

बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक सध्या राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाल्यानंतर निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही काँग्रेसला निवडणूक बिनविरोध करण्याचा सल्ला देणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे केवळ राजकीय नव्हे, तर भावनिक दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे….

Read More

धनंजय मुंडेंनी माझा अर्ज बाद करण्यासाठी मुंबईहून वकील पाठवला:बारामती पोटनिवडणुकीत करुणा मुंडेंचा खळबळजनक आरोप

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आता राजकीय ठिणगी पडली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी करुणा मुंडे यांनी आपला अर्ज कायम ठेवत निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. बारामती पोटनिवडणुकीत माझा अर्ज बाद करण्यासाठी धनंजय…

Read More

Seychelles Receives 250 MT Food Aid; Bangladesh FM Rahman Visits India

Marathi News National Seychelles Receives 250 MT Food Aid; Bangladesh FM Rahman Visits India | April 9 Current Affairs 11 तासांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी जाणून घ्या, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत… निधन (मृत्यू) 1. माजी केंद्रीय मंत्री मोहसिना किदवई यांचे निधन 8 एप्रिल रोजी माजी केंद्रीय मंत्री मोहसिना किदवई…

Read More

नीच कृत्य करणाऱ्यांना जात-धर्म नसतो:खरात अन् एरंडे हिंदू आहेत म्हणून संघटना गप्प का? लव्ह जिहाद' सर्वांना लागू करा- संजय राऊत

नाशिकमधील खरात बाबा काय मुस्लीम होता का? ऐंरडे काय मुस्लीम होते का? मौला, पादरी होते का? नीच कृत्य करणाऱ्यांना जात धर्म नसतो. खरात बाबा हिंदू आहे, एरंडे हिंदू आहेत म्हणून हिंदू संघटना नरमाईची भूमिका घेणार आणि इतर धर्मांचे कुणी सापडल्यावर रस्त्यावर येणार हे चालणार नाही, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमधील आयटी कंपनीत सुरू…

Read More

सुनेत्रा पवारांनी दोनदा फोन करून बिनविरोधसाठी विनंती केली:देवेंद्र फडणवीस म्हणजे झारीतले शुक्राचार्य, निवडणूक लढायला आम्ही सक्षम- हर्षवर्धन सपकाळ

बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांनी दोन वेळा फोन करत संपर्क साधला आणि बिनविरोध निवडणुकीची विनंती केली, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. आपण सभ्यतेने वाटचाल केली पाहिजे असे या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रयत्न करतो आहोत. आमची भूमिका ही सर्वांना माहिती आहे. सत्ताधाऱ्यांनी तसा प्रतिसाद दिलेला नाही. बारामती निवडणूक लढण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, पण जी…

Read More

सरकार म्हणाले- अनेक मंदिरांमध्ये प्रसादात दारू दिली जाते:न्यायालय हे म्हणू शकत नाही की तिथे दारू देऊ नका; शबरीमाला प्रकरणात सुनावणी

केंद्र सरकारने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात शबरीमाला प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मंदिरांच्या रीतीरिवाजांचा उल्लेख केला. एएसजी नटराज म्हणाले, दक्षिण भारतीय मंदिरांमध्ये प्रसाद म्हणून मद्य दिले जाते. उद्या तुम्ही यावर आक्षेप घेऊ शकत नाही की मद्य देऊ नये. एक उदाहरण देताना ते म्हणाले, अनेक मंदिरांमध्ये शाकाहारी भोजन दिले जाते. जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या आवडीनुसार किंवा अंतरात्म्याच्या आवाजावरून मांसाहारी भोजन…

Read More

रब्बीच्या ई पीक पाहणीमध्ये वसमत तालुक्याचे काम जिल्ह्यात अव्वल:42 हजार हेक्टरपैकी 31 हजार हेक्टर क्षेत्रावरील पाहणी पूर्ण, तहसीलदार शारदा दळवीचे नियोजन

हिंगोली जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या ई पिक पाहणीमध्ये वसमत तालुक्याचे काम अव्वल ठरले असून 42 हजार हेक्टरपैकी 31 हजार हेक्टरवरील ई पिक पाहणीचे काम पूर्ण झाले आहे. तर सर्वात कमी 46 टक्के काम कळमनुरी तालुक्याचे झाले आहे. वसमतच्या तहसीलदार शारदा दळवी यांच्या नियोजनामुळे मुदतीमध्ये सर्वात जास्त काम झाले आहे. हिंगोली जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सर्व साधारण क्षेत्र…

Read More

पार्थ पवारांच्या विधानावर रोहित पवारांकडून काँग्रेसची दिलगिरी:अजित पवार प्रकरणी FIR दाखल करण्यास सरकारने विरोध का केला, सुप्रिया सुळेंचा सवाल

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जात असतानाच, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन महत्त्वाची चर्चा केली. काँग्रेसबद्दल जे काही वक्तव्य झाले, त्याबद्दल रोहितने दिलगिरी व्यक्त केली…

Read More