Headlines

Admin

सचिन हनमघर यांच्या 'बी हॅप्पी' पुस्तकाचे प्रकाशन:भयभीत युवा पिढीसाठी 'बी हॅप्पी'चा मंत्र उपयुक्त – भारत सासणे

आजची पिढी एका अर्थाने भयभीत आहे. आज काय घडते आहे; उद्या काय होणार याविषयी त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत ‘बी हॅप्पी’चा मंत्र नक्कीच उपयुक्त ठरेल. तुम्ही आनंदी असाल तर इतरांना देखील आनंदी करू शकता आणि त्यातूनच समाज आनंदाच्या एका विशिष्ट वलयामध्ये जगू लगतो, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष,…

Read More

पुणे नवरात्रौ महोत्सवात रसिकांनी अनुभवली बर्मन पितापुत्रांची सांगीतिक जादू:ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांना श्रद्धांजली अर्पण करत कार्यक्रमाची सुरुवात

अर्थपूर्ण शब्द आणि प्रसंगानुसार बांधलेली चाल, सुरेल आवाज, लोकप्रिय नट, रमणीय चित्रीकरण स्थळे…असा माहौल रसिकांच्या मनात जागविणारी जादू ‘मॅजिक ऑफ बर्मन्स’ या कार्यक्रमातून रसिकांनी अनुभवली. ३२ व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाच्या दुसऱ्या माळेची सायंकाळ गणेश कला क्रीडा रंगमंच येथे हिंदी चित्रपटसृष्टीतील सचिन देव बर्मन आणि राहुल देव बर्मन, या पितापुत्रांच्या जोडीने गाजवलेल्या गीतांमुळे स्मरणीय ठरली. कृष्णधवल…

Read More

विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी मतमोजणी केंद्राचा आढावा घेतला:औरंगाबाद पदवीधर मतदारसंघासाठी कलाग्राम येथील सुरक्षा व सुविधांची पाहणी करून दिल्या सूचना

छत्रपती संभाजीनगर येथे औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतमोजणी केंद्र उभारले आहे. विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी आज चिकलठाणा येथील कलाग्रामसमोरील केंद्राची पाहणी करून सुरक्षा व सुविधांचा आढावा घेतला. श्रीकांत यांनी सीसीटीव्ही, मतपेट्या ठेवण्याची जागा, मतमोजणी कक्ष, वीजपुरवठा, पर्यायी वीज व्यवस्था, अग्निशमन यंत्रणा आणि रुग्णवाहिका तपासल्या. वीजपुरवठ्यामुळे मतमोजणीत अडचण येऊ नये, यासाठी खबरदारी घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना…

Read More

शरद पवारांना विश्वास, महाविकास आघाडीचे उमेदवार बहुमताने जिंकतील:पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत परिवर्तनाची हाक; बालगंधर्व रंगमंदिरात मेळावा

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार बहुमताने विजयी होतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला. हर्षदा देशमुख-जाधव यांच्यात राजकारणाची जाण आणि भविष्याचा वेध घेण्याची क्षमता आहे. पुरोगामी विचारांचा वारसा त्या सक्षमपणे पुढे नेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. बालगंधर्व रंगमंदिर येथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित…

Read More

बावधनमध्ये 5 अनधिकृत आरएमसी प्लांट जमीनदोस्त:35 हजार चौरस फुटांवरील बांधकामे पाडली, वीजपुरवठा बंद करून प्लांट सील

बावधन बुद्रुक परिसरातील अनधिकृत रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांटविरोधात पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने मंगळवारी (दि. १३ ऑक्टोबर) धडक कारवाई केली. या कारवाईत पाच अनधिकृत आरएमसी प्लांटमधील सुमारे ३५ हजार चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. तसेच, या पाचही प्लांटचा वीजपुरवठा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून कायमस्वरूपी बंद करून घेण्यात आला. आकाशचिन्ह विभागाने प्लांटच्या ऑपरेटिंग…

Read More

राजू शेट्टींच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन:पुणे-बेंगलोर महामार्ग ठप्प; आंदोलनास्थळीच जेवणाची व्यवस्था, महामार्गावर बसल्या पंगती

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर हजारो शेतकऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. तसेच महामार्गावर धरणे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जेवणाची देखील व्यवस्था करण्यात आली असून रस्त्यावरच पंगती देखील बसवण्यात आल्या. कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या कोगनोळी टोल नाका तसेच कर्नाटक येथील हत्तरकी टोल नका येथे हजारो…

Read More

राज्यात चारा टंचाई टाळण्यासाठी ‘चारा साक्षरता अभियान’:पशुसंवर्धन विभागाची पूर्वतयारी; चारा जतन, प्रक्रिया व उत्पादनावर भर

राज्यातील काही भागांमध्ये पर्जन्यमानातील तूट आणि खरीप पिकांच्या उत्पादनावर झालेला परिणाम लक्षात घेता, आगामी काळात पशुधनासाठी हिरवा व वाळलेला चारा उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. या संभाव्य चारा टंचाईवर वेळीच मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यभरात ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत चारा जतन, पीक अवशेषांचा योग्य वापर, चाऱ्यावर प्रक्रिया,…

Read More

सेवा विलंबासाठी रोज 250 रुपये दंड हवा:नागरिक सोशल फाउंडेशनची राज्य सरकारकडे मागणी; 21 दिवसांत सेवा देण्याची मर्यादा निश्चित करण्याचा प्रस्ताव

शासकीय सेवा वेळेत मिळाव्यात आणि विलंब झाल्यास नागरिकांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी, यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अधिक सक्षम करण्याची मागणी नागरिक सोशल फाउंडेशनने राज्य सरकारकडे केली आहे. सेवा देण्यास विलंब झाल्यास प्रत्येक दिवसासाठी २५० रुपये दंड, सर्व शासकीय सेवांसाठी २१ दिवसांची कालमर्यादा आणि दोषी अधिकाऱ्यांकडून दंडाची वसुली, अशा महत्त्वपूर्ण शिफारशी संस्थेने केल्या आहेत. संस्थेचे…

Read More

सर्वोच्च न्यायालयात दिल्लीतील निदर्शनांवरील सुनावणी पुढे ढकलली:CJP च्या निदर्शनात 7 हजार लोकांना ताब्यात घेतले, 45 स्थानके बंद होती

दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनापूर्वी मेट्रो-ट्रेन सेवा बंद करणे, इंटरनेटमध्ये व्यत्यय आणणे आणि लोकांना ताब्यात घेण्याशी संबंधित याचिकांवरील सुनावणी १५ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. न्यायालयाने मंगळवारी सांगितले की, सुनावणी घेणाऱ्या खंडपीठाचे न्यायमूर्ती व्ही. मोहना यांची प्रकृती बिघडल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केंद्र सरकारचे उत्तर दाखल करण्यासाठी अतिरिक्त वेळ मागितला….

Read More

पुढील 25 वर्षात आरोग्यदायी अन्नाचे मोठे आव्हान:पद्मश्री पोपटराव पवार; सारसबाग मंदिरात महिला शेतकरी व उद्योजिकांचा सन्मान

प्लास्टिक नावाचा मोठा राक्षस आपण आणला आहे. जमिनीखाली पाणी जायचे बंद केले आणि जमिनीवर पाणी आणून ठेवले, ही उद्याच्या भविष्यकाळात सर्वात मोठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे पुढील २५ वर्षात आरोग्यदायी अन्नाचे सर्वात मोठे आव्हान आपल्यासमोर आहे, असे मत पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केले. श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग तर्फे सार्वजनिक नवरात्रोत्सवात मंदिरामध्ये ‘अन्नदाता शक्ती :…

Read More