पुणे महापालिकेत स्फोटांचे आवाज, सायरनचा गजर:अग्निशमन दलाच्या अचानक मॉक ड्रिलने अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम; 15 मिनिटांत सज्जतेची चाचणी
महापालिकेच्या मुख्यालयात सोमवारी दुपारी अचानक स्फोटांसारखे मोठे आवाज आणि सायरनचा गजर ऐकू आल्याने काही काळ भीती आणि कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले. प्रत्यक्षात कोणतीही आपत्ती घडलेली नसून अग्निशमन दलाकडून आपत्कालीन प्रतिसादाची चाचणी घेण्यासाठी मॉक ड्रिल सुरू असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या आवाजांमागील कारणाचा उलगडा झाला. आंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम न्यूनीकरण दिनानिमित्त महापालिकेच्या अग्निशमन दलाने दुपारी चारच्या सुमारास हा…