Headlines

Admin

अयोध्या मंदिर दानपेटी चोरीत 3 कोटींपर्यंत अपहार:कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराजांचा दावा; राजीनाम्याच्या चर्चा फेटाळल्या

अयोध्या राम मंदिरातील दानपेटीतून झालेल्या चोरीप्रकरणी अयोध्या ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांनी मोठे विधान केले आहे. त्यांच्या मते, या चोरीत सुमारे तीन कोटी रुपयांपर्यंतचा अपहार झाला असावा. मोठ्या प्रमाणात सोने, चांदीचे दागिने आणि रक्कम चोरीला गेल्याचे दावे चुकीचे असून, याबाबत ‘पराचा कावळा’ केला जात असल्याचे त्यांनी म्हटले. या चोरीचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचेही त्यांनी…

Read More

राष्ट्रवादीत पुन्हा मोठ्या भूकंपाची नांदी?:शरद पवारांच्या 9 आमदारांचा 'NDA'कडे कल; जयंत पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील ऐतिहासिक फुटीनंतर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदारही वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात विधान भवनात झालेल्या एका गुप्त बैठकीने या चर्चांना उधाण आणले आहे. आमदारांचा एनडीएसोबत जाण्याचा कल?…

Read More

पंजाबी रेसलरची एक चापट अन् WWE चॅम्पियन बेशुद्ध:जमिनीवर पडला, पुन्हा उठलाच नाही; जिंकताच शेराने टी-शर्ट काढून फडकवले

पंजाबमधील फिरोजपूरचा कुस्तीपटू अमनप्रीत सिंगने पॉवर स्लॅप स्पर्धेत WWE चा माजी वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियन जॅक हेजरला एका चापटीत बेशुद्ध केले. जॅक हेजर पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये आघाडीवर होता, पण तिसऱ्या फेरीत शेराच्या एका जोरदार चापटीने त्याला नॉकआउट केले. जिंकल्यानंतर शेराने मंचावरच आपले टी-शर्ट काढून जल्लोष केला. तर हेजरला त्याच्या कारकिर्दीतील पहिल्या नॉकआउट पराभवाला सामोरे जावे लागले….

Read More

पुण्यात 24 तासांत तीन भीषण अपघात:बिबवेवाडी, लोणी काळभोर अन् वडगाव शेरीत तिघांचा मृत्यू

पुण्यात तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन ज्येष्ठ नागरिकांसह तिघांचा मृत्यू झाला आहे. बिबवेवाडी, लोणी काळभोर आणि वडगाव शेरी या तीन वेगवेगळ्या भागांमध्ये या घटना घडल्या. याप्रकरणी संबंधित वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बिबवेवाडी येथील चंद्रलोक चौकात सोमवारी (13 जुलै) सकाळी भरधाव टेम्पोने धडक दिल्याने दुचाकीस्वार मुकुंद अनंत तबीब (वय 76, रा. कांचनगंगा सोसायटी, बिबवेवाडी) यांचा…

Read More

पुण्यात टोळक्याची दहशत, 4 मोटारींची तोडफोड:सहकारनगरमध्ये मध्यरात्री घडली घटना, 18 जणांविरुद्ध गुन्हा, फरार आरोपींचा शोध सुरू

पुण्यातील सहकारनगर भागात टोळक्याने मध्यरात्री दहशत माजवत चार मोटारींची तोडफोड केली. मल्हार मार्तंड सोसायटीत घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी 18 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नीलेश उमेश मोहिते (वय 38, रा. मल्हार मार्तंड सोसायटी, सहकारनगर क्रमांक एक, पद्मावती) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (13 जुलै) मध्यरात्री एकच्या सुमारास वेगवेगळ्या…

Read More

स्मार्ट मीटरमध्ये ‘कॅमेरा’ असल्याचा दावा खोटा:‘कॅमेरा’ची अफवा पसरवणाऱ्या ग्राहक प्रतिनिधीसह यूट्यूब संपादकावर गुन्हा दाखल

महावितरणच्या स्मार्ट मीटरमध्ये ‘कॅमेरा’ असल्याचा धादांत खोटा आरोप करून सोशल मीडियाद्वारे अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध अखेर कायदेशीर बडगा उगारण्यात आला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्राहक संघटनेचे नंदन मेघश्याम वेंगुर्लेकर आणि ‘कोकणसाद’ यूट्यूब चॅनेलचे संपादक सागर चव्हाण यांच्याविरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात रविवारी (12 जुलै) फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सावंतवाडी येथे 10 जुलै…

Read More

मतं विकत घेण्यासाठी 'लाडकी बहीण' योजनेत 3515 कोटींचा अपहार:संपूर्ण मंत्रिमंडळावर गुन्हा दाखल करा; संजय राऊत यांचा घणाघात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर, विशेषतः ‘लाडकी बहीण’ योजनेतील कथित गैरव्यवहारावर सडकून टीका केली. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसमधील (शरद पवार गट) सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि जयंत पाटील यांच्या भूमिकेवरही त्यांनी शिवसेनेची बाजू स्पष्ट केली. लाडकी बहीण योजनेत ‘स्टेट कॅप्चर’चा गुन्हा ‘लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीवर राऊत…

Read More

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर:फडणवीस यांच्यानंतर आता शिंदे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीला

‘ऑपरेशन टायगर’च्या यशस्वीतेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर गेले असून, या दौऱ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात महत्त्वाची भेट झाली होती. त्यानंतर आता शिंदे दिल्लीत भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी कॅबिनेट मंत्रिमंडळ विस्ताराची…

Read More

‘राम मंदिरातील चोरटा लवकुश तुमच्या गावचा ना…’:लोक म्हणाले- बदनामी झाली; आजीचा आरोप- ठाकुरांनी आमच्या घरात लपवले पैसे

‘कुठेही जा, लोक हसत विचारतात- तुमच्या गावात राम मंदिराच्या देणगीची चोरी करणारा लवकुश राहतो ना…? हे ऐकून मान खाली जाते, पण काही उत्तर देता येत नाही.’ हे सांगताना फगौली ठकुरान गावचे (रुदौली) लोकांना लाज वाटते. कारण फक्त एकच आहे की, या गावात लवकुश मिश्राच्या घरातून 10 लाख रुपये मिळाले होते. हा आरोप आहे की, ही…

Read More

पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्रात ATS ची छापेमारी:पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीचे नेटवर्क उद्ध्वस्त

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात 23 हून अधिक ठिकाणी, तर राज्यात एकूण 65 ठिकाणी मोठी छापेमारी केली आहे. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संशयास्पद नेटवर्कशी संबंधित देशविघातक कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली. एटीएसने अनेक संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’च्या सूचनेवरून…

Read More