पुण्यात कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे 2 वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू:पावसाच्या पाण्याने भरलेल्या उघड्या खड्ड्यात बुडून अंत, अज्ञात ठेकेदारावर गुन्हा
कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे दोन वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याला जीव गमवावा लागल्याची हृदयद्रावक घटना पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर परिसरात घडली आहे. घरासमोर खेळत असताना पावसाच्या पाण्याने भरलेल्या उघड्या खड्ड्यात पडून सोहम लखन कसबे (वय 2) या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून लोणी काळभोर पोलिसांनी अज्ञात कंत्राटदाराविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू…