तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता दूध सम्राटांकडे:'फार्म टू प्लेट' कडक नियमावली लागू, उल्लंघन केल्यास परवाने रद्द करण्याचा इशारा
राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईचे सत्र सुरूच असून, हॉटेल, बेकरी आणि पनीर विक्रेत्यांनंतर आता त्यांनी आपला मोर्चा राज्यातील ‘दूध सम्राटांकडे’ वळवला आहे. दुग्धजन्य पदार्थांमधील वाढती भेसळ आणि ग्राहकांच्या आरोग्याशी होणारा खेळ थांबवण्यासाठी मुंढे यांनी राज्यात ‘सेव्ह फूड, सेव्ह ड्रग’ ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत दूध…