Headlines

तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता दूध सम्राटांकडे:'फार्म टू प्लेट' कडक नियमावली लागू, उल्लंघन केल्यास परवाने रद्द करण्याचा इशारा




राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईचे सत्र सुरूच असून, हॉटेल, बेकरी आणि पनीर विक्रेत्यांनंतर आता त्यांनी आपला मोर्चा राज्यातील ‘दूध सम्राटांकडे’ वळवला आहे. दुग्धजन्य पदार्थांमधील वाढती भेसळ आणि ग्राहकांच्या आरोग्याशी होणारा खेळ थांबवण्यासाठी मुंढे यांनी राज्यात ‘सेव्ह फूड, सेव्ह ड्रग’ ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत दूध संकलनापासून ते थेट ग्राहकांच्या ताटात जाईपर्यंतच्या संपूर्ण पुरवठा साखळीसाठी अत्यंत कडक नियमावली जाहीर करण्यात आली आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की, दुधातील भेसळ आणि कृत्रिम दुधाचा सुळसुळाट रोखण्यासाठी संपूर्ण ‘इकोसिस्टम’ बदलणे गरजेचे आहे. त्यानुसार जारी करण्यात आलेले नवे आदेश हे ‘दूध संकलन केंद्रे आणि दूध शीतकरण केंद्रे, दूध प्रक्रिया आणि पॅकेजिंग करणारे उद्योग, किरकोळ विक्रेते आणि बल्क (घाऊक) दूध विक्रेते, पनीर, खवा, लोणी, क्रीम, चीज आणि आईस्क्रीमचे उत्पादन व विक्री करणारे व्यावसायिक’ यांना बंधनकारक असतील. केवळ कागदी घोडे नकोत, अन्यथा परवाना थेट रद्द हॉटेल आणि रेस्टॉरंट्सवर केलेल्या कारवाईचा दाखला देत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दूध व्यवसायिकांना कडक इशारा दिला आहे. हॉटेल तपासणीदरम्यान अनेकांनी ‘पेस्ट कंट्रोल’ केल्याची केवळ खोटी प्रमाणपत्रे दाखवली होती, मात्र प्रत्यक्षात तिथे कोणतेही काम झाले नव्हते. अशा लबाडी करणाऱ्या हॉटेल्सचे परवाने एफडीएने तात्काळ रद्द केले आहेत. “मला केवळ कागदावरचे नियम आणि प्रमाणपत्रे नको आहेत. जर दुग्ध व्यवसायाच्या ठिकाणी प्रत्यक्ष नियमांचे पालन झाले नाही, तर कोणतीही पूर्वसूचना न देता थेट व्यावसायिक लायसन्स (परवाना) रद्द केले जाईल,” असा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. आदेशाचा उद्देश काय? “आदेशाचा उद्देश केवळ भेसळ रोखणे नसून सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण वाढ करणे, प्रामाणिक दुध व्यवसायांना प्रोत्साहन देणे आणि राज्यात आधुनिक अन्न सुरक्षा संस्कृती विकसित करणे हा आहे. राज्यभर करण्यात आलेल्या तपासण्या, निरीक्षण, नमुना विश्लेषणे अंमलबजावणी कारवाईतून दूध पुरवठा साखळीच्या विविध टप्यावर काही गंभीर त्रुटी सातत्याने निदर्शनास आल्या. या त्रुटी केवळ जिल्ह्यापूत्या नाही संपूर्ण पुरवठा साखळीमध्ये एकसमान अनुपालन व्यवस्था आवश्यक आहे,” असेही मुंढेंनी म्हटले. प्रशासनाला तपासणीत आढळलेल्या गंभीर त्रुटी राज्यभरात केलेल्या तपासणीत अन्न साखळीमध्ये प्रशासनाला खालील धक्कादायक प्रकार आढळून आले आहेत:



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *