Headlines

जळगावात लाचखोर अधिकाऱ्याच्या घरी ACB चा मोठा छापा:कोट्यवधींचे घबाड उघड, तब्बल 2.94 कोटींची बेहिशोबी संपत्ती जप्त




जळगाव येथे एका अधिकाऱ्याच्या घरावर पडलेल्या मोठ्या छाप्यामुळे संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. अकोला येथे कार्यरत असलेल्या व जळगावात वास्तव्यास असलेल्या एका मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरावर नुकतीच धडक कारवाई करण्यात आली. या धाडीमध्ये अधिकाऱ्याच्या घरातून प्रचंड प्रमाणात रोख रक्कम आणि सोने जप्त करण्यात आले असून, एखाद्या धनकुबेरालाही लाजवेल अशी बेहिशोबी संपत्ती याठिकाणी सापडली आहे. जळगावमधील आजवरची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात असून, उघडकीस आलेल्या या मोठ्या घबाडामुळे प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. लाचखोरीच्या गुन्ह्यात अटक झालेले अकोल्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्या जळगाव येथील निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक आणि जळगाव पथकाने टाकलेल्या छाप्यात कोट्यवधींचे मोठे घबाड उघडकीस आले आहे. काल रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या ‘इन-कॅमेरा’ झाडाझडतीमध्ये तब्बल दीड कोटी रुपयांची रोकड, 72 लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि 62 लाख रुपयांच्या मालमत्तेची कागदपत्रे असा एकूण 2 कोटी 94 लाख 64 हजार 847 रुपयांचा अवाढव्य मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रात्रभर चाललेल्या या कारवाईत एवढी प्रचंड संपत्ती मोजता मोजता अधिकाऱ्यांचीही अक्षरशः दमछाक झाली असून, जळगावमध्ये उघडकीस आलेल्या या बेहिशोबी मालमत्तेमुळे प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अकोल्यात 10 हजारांची लाच अकोला येथे 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले गेलेले अधिकारी किरण चौधरी यांच्यावर अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या लाचखोरीच्या कारवाईनंतर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 8 ते 10 अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाने त्यांच्या जळगाव येथील निवासस्थानी छापा टाकून घराची सखोल झाडाझडती घेतली. या कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांना अत्यंत मोठ्या प्रमाणावर बेहिशोबी मालमत्ता आणि घबाड आढळून आले असून, जप्त करण्यात आलेल्या या संपत्तीबाबतची अधिकृत माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *