Headlines

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण:सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामिनाचा मार्ग मोकळा




केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणातील आरोप सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना आज न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याआधी दोन्ही आरोपींना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. तपास अधिकाऱ्यांनी तपासाची व्याप्ती लक्षात घेऊन आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती आणि न्यायालयाने ३ जुलैपर्यंत मुदतवाढ मंजूर केली. आज दोघांची कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी त्यांना मावळ कोर्टासमोर हजर केले. आज पार पडलेल्या सुनावणीत पोलिसांनी आणखी तपासासाठी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. परंतु, कोर्टाने ती मागणी फेटाळून लावत दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर केली. यासोबतच आता सिया गोयल आणि चेतन चौधरी यांचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे. आम्ही हे वृत्त सातत्याने अपडेट करत आहोत…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *