एका दिवशी 89 गुन्हे, 90 आरोपींना अटक:जिल्ह्यात अवैध विक्रेत्यांवर पोलिसांची "मास रेड''
लातूर जिल्ह्यात अवैध दारूविक्री आणि गावठी हातभट्ट्यांवर अंकुश लावण्यासाठी पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या नेतृत्वाखाली २७ जून रोजी संपूर्ण जिल्ह्यात “मास रेड’ (सामूहिक छापेमारी) मोहीम राबवण्यात आली. या धडक कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या मोहिमेत देशी, विदेशी मद्य आणि हातभट्टीच्या अड्ड्यांवर अचानक छापे टाकण्यात आले. यामध्ये संपूर्ण जिल्ह्यात तब्बल ८९ गुन्हे दाखल…