शाळेतील मित्र-मैत्रिणीचा मानसिक त्रास:ब्लॅकमेलिंगला कंटाळून 8 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; अंबाजोगाईतील धक्कादायक घटना
मैत्रिणीकडून होणारे ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक छळाला कंटाळून एका 14 वर्षीय शाळकरी मुलीने आपले जीवन संपवल्याची धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना अंबाजोगाईत समोर आली आहे. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीसह अन्य दोन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे. रिद्धी अशोक चाटे (वय 14) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती इयत्ता आठवीमध्ये शिकत होती….