Headlines

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात राजकीय घुसखोरीचा आरोप:उदय सामंतांचा काँग्रेसवर घणाघात; म्हणाले- मनोज जरांगे पाटलांच्या शंकांचे निरसन करू




राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आज गुरुपौर्णिमेनिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरुळ येथे दर्शनासाठी आले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील अनेक घडामोडींवर सविस्तर भाष्य केले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेसने आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या खांद्यांचा वापर करू नये, असे सामंत म्हणाले. यासोबतच, मनोज जरांगे पाटील यांचा आंदोलनाचा इशारा, कंगना रनौत यांचे वादग्रस्त वक्तव्य आणि शेतकऱ्यांचे प्रश्न या सर्व मुद्द्यांवर त्यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनात राजकीय नेत्यांचा शिरकाव विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत बोलताना उदय सामंत म्हणाले की, विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाचे श्रेय लाटण्याचा अनेक जण प्रयत्न करत आहेत. या आंदोलनामध्ये काही राजकीय पुढारी जाणीवपूर्वक घुसले होते आणि त्यांनी या आंदोलनाची दिशा बदलण्याचा प्रयत्न केला. अभिजित दिपके यांनी पुन्हा दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर ते म्हणाले की, दिपके यांनी मांडलेली भूमिका सरकार नक्कीच ऐकून घेईल. कुठल्याही विद्यार्थ्याला त्रास होणार नाही, याची काळजी सरकार घेत असून यावर लवकरच सकारात्मक तोडगा काढला जाईल. कंगना रनौत यांचे मत वैयक्तिक, पक्षाचे नाही खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौत यांनी विद्यार्थ्यांबाबत केलेल्या वक्तव्यावरून सध्या मोठा वाद सुरू आहे. यावर सामंत यांनी स्पष्टीकरण दिले. कंगना रनौत यांनी जे काही स्टेटमेंट केले आहे, ते त्यांचे पूर्णपणे वैयक्तिक मत आहे. त्यांच्या या वक्तव्याशी आमचा किंवा आमच्या पक्षाचा काहीही संबंध नाही, असे सामंत म्हणाले. जरांगे पाटलांच्या शंकांचे निरसन करू मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा २९ ऑगस्टपासून ‘निर्णायक आंदोलना’चा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर सामंत यांनी संवादाची भूमिका मांडली. ते म्हणाले, “मनोज जरांगे पाटील यांच्या मनात आरक्षणाच्या अनुषंगाने काही शंका असतील, तर सरकार त्यांच्या त्या सर्व शंकांचे नक्कीच निरसन करेल. सरकारसाठी शेतकरीच प्राधान्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सामंत यांनी सरकारच्या प्राधान्यक्रमाबाबत भाष्य केले. “आमचे सरकार नेहमीच सर्वात आधी शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष देते आणि त्यानंतरच उद्योगांकडे लक्ष जाते,” असे सांगत शेतकऱ्यांचे हित हेच सरकारचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हेही वाचा.. मनोज जरांगेंचा अंतरवालीतून पुन्हा एल्गार: 29 ऑगस्टपासून निर्णायक आंदोलनाचा इशारा, म्हणाले- 58 लाख प्रमाणपत्रे घेतल्याशिवाय हटणार नाही मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. अंतरवाली सराटी येथून त्यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. ५८ लाख कुणबी नोंदींची प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी येत्या २९ ऑगस्ट रोजी शेवटचे आणि निर्णायक आंदोलनाची मोठी घोषणा केली आहे. समाजाला वेड्यात काढले जात असल्याचा आरोप करत जरांगे यांनी आरपारच्या लढाईचे रणशिंग फुंकले आहे. सविस्तर वाचा
‘NEET’ फेरपरीक्षेचाही पेपर फुटला?: आमदार रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, गुजरातमधून 3 दिवस आधीच पेपर फुटल्याचा दावा
देशात सध्या पेपरफुटीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, यातच आता आमदार रोहित पवार यांनी ‘नीट’ परीक्षेबाबत एक अत्यंत खळबळजनक आरोप केला आहे. ‘नीट’चा पेपर फुटल्यानंतर जी फेरपरीक्षा घेण्यात आली होती, तिचा पेपरही परीक्षेच्या तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटल्याचा दावा पवार यांनी एका ट्विटद्वारे केला आहे. जर ही गोष्ट खरोखरच सत्य असेल, तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने ही अत्यंत चिंताजनक आणि गंभीर बाब असल्याचेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *