![]()
पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्याने वाळून गेलेल्या सोयाबीनमुळे हताश झालेल्या शेतकऱ्यानेघरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हीघटना बुधवारी १६ सप्टेंबरला जिंतूरतालुक्यातील वर्णा या गावात घडली. शेतात वाळलेले सोयाबीन पाहून ते घरी परतले, नंतर त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. तर शिंगणापूर येथेही कर्जबाजारी शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. जिल्ह्यात दोन दिवसांतदोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. वर्णा या गावातील गट नंबर ३४३ च्या वाडी शिवारात कोरडवाहू शेती करणारे हरिभाऊ सुभानराव ढवळे (६२) यांचेही सोयाबीनवाळले होते. त्यामुळे आर्थिक विवंचनेतूनत्यांनी स्वतःच्या घरी गळफास घेऊनआत्महत्या केली. पोलिस पाटील डिगांबरअभुरे यांनी बोरी पोलीस स्टेशनचे एपीआयअभिजीत आइके यांना घटनेची माहिती दिली.बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनकरण्यात आले. मृताच्या पश्चात हरिभाऊढवळे यांच्या पश्चात दोन मुले, सुना व नातवंडेअसा परिवार आहे. मृताच्या कुटुंबालाशासकीय मदत मिळावी, अशी मागणी आहे. वडिलांच्या नावावरील कर्जफेडण्याच्या चिंतेतून गळफास सततची नापिकी आणि वडिलांच्या नावेअसलेल्या बँक कर्जाच्या झाडाला विवंचनेतून४५ शेतकऱ्याने वर्षीय गळफास घेऊनआत्महत्या केल्याची घटना शिंगणापूर येथे १७सप्टेंबरला उघडकीस आली. बाबासाहेबगोविंदराव गायकवाड (४५) असे मृताचे नावआहे. वडिलांच्या नावे असलेले बँकेचे कर्जकसे फेडायचे या विवंचनेत ते होते. याचमानसिक तणावातून गुरुवारी सकाळी त्यांनीघराजवळील आंब्याच्या झाडाला गळफासलावून आत्महत्या केली.
Source link
परभणीमध्ये दोन दिवसांतच दोन शेतकऱ्यांची आत्महत्या:जिंतूर तालुक्यातील वर्णा अन् शिंगणापूर गावातील घटना