Headlines

मंत्री, आमदारांसह 32 व्हीआयपींची दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात उधारी:‘दिव्य मराठी’च्या हाती थकबाकीदारांची यादी, पाहुणचारानंतर सदनाचे पैसे न भरताच केले चेकआऊट




दिल्लीत महाराष्ट्राच्या वैभवाचे प्रतीक असलेल्या आलिशान ‘महाराष्ट्र सदन’मध्ये मंत्री, आमदार, आयएएस अधिकारी आणि त्यांच्या खास मर्जीतील पाहुण्यांनी लाखो रुपयांचा मोफत पाहुणचार घेतल्याची धक्कादायक माहिती ‘दिव्य मराठी’च्या हाती लागलेल्या अधिकृत दस्तऐवजांतून समोर आली आहे. एकूण ३२ व्हीआयपींनी महाराष्ट्र सदनातील निवास, भोजनापोटी तब्बल २ लाख ३८ हजार १०० रुपयांचे सरकारी बिल थकवले आहे. राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत हे महाराष्ट्र सदन चालवले जाते. यात मुख्यमंत्री, मंत्री आणि सनदी अधिकाऱ्यांसाठी व्हीव्हीआयपी सुट्स आहेत. शिवाय अधिकारी आणि अन्य नागरिकांसाठी आलिशान खोल्यादेखील आहेत. फाइव्हस्टार दर्जाच्या या सदनामध्ये राहण्यास अनेक जण पसंती देतात. शास्त्रज्ञ, बँक अधिकाऱ्यांचा फुकट मुक्काम बँक ऑफ महाराष्ट्रचे विशाल सेठिया (१२,००० रु.) व दिनकर संकपाळ (३,००० रु.), मुलगी कोमल रहाणे (१२,००० रु.), सदस्य नथा शेवाळे (१८,००० रु.), वैज्ञानिक धीरेंद्र श्रेष्ठ (१२,००० रु.), परमानंद शर्मा (६,००० रु.) व अनिल कुलकर्णी (१,००० रु.) यांचे बिल थकीत आहे. सिस्टिममध्ये फेरफार? मुख्यमंत्री कार्यालयातील सुनील कुमार यांच्या ३००० रुपयांच्या बिलावर “Generate in Paid Mode by Mistake” अशी नोंद आढळली आहे. पैसे न भरताच नोंद ‘पेड’ करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय आहे. तसेच सीएमओ सल्लागार जितेंद्र लवंडे यांचेदेखील २००० रुपये थकीत आहेत. नियम काय सांगतो? महाराष्ट्र कोषागार नियम आणि राज्य शासनाने १७ नोव्हेंबर २०१८ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार सदन चेकआऊट करण्यापूर्वीच पूर्ण बिल भरणे आवश्यक आहे. या जीआरमध्ये सदनाचा वापर, बिल भरण्याबाबत सविस्तर एसओपी दिलेली आहे. मात्र, त्याचे पालन होताना दिसत नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *