Headlines

प्रसाद म्हणून एरंडीच्या बिया खाल्ल्यामुळे‎कापूसवाडगावात 13 मुलांना विषबाधा:‎उलट्या, अस्वस्थतेचा त्रास : मुले वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल‎




शाळेला सुट्टी म्हणून गल्लीतील मुलांनी‎मातीचे गणपती बनवले… खेळता-खेळता‎गणपतीपुढे प्रसाद म्हणून एरंडीच्या बिया‎वाटल्या आणि १३ मुलांनी त्या खाल्ल्या.‎दुपारचा हा निरागस खेळ काही तासांतच गंभीर‎वळणावर पोहोचला. सायंकाळी एकामागोमाग‎मुलांना पोटदुखी, उलट्या आणि अस्वस्थतेचा‎त्रास सुरू झाला अन् कापूसवाडगावातील‎चर्चमागील गल्लीमध्ये खळबळ उडाली.‎अनेक मुलांची प्रकृती बिघडल्याने पालकांची‎झोप उडाली. गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास‎ही घटना घडली.‎ ‎वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात आधी पाच‎आणि त्यानंतर आणखी आठ अशा १३ मुलांना‎दाखल करण्यात आले. ड्यूटीवरील डॉ. हर्षल‎धाबे यांनी तातडीने उपचार सुरू केले. सर्व‎मुलांना २४ तास वैद्यकीय निगराणीखाली‎ठेवण्यात आले असून शुक्रवारी कोणालाही‎सुटी देण्यात आली नव्हती. बियांत विषारी घटक‎ एरंडीच्या बियांमध्ये ‘ रायसीन’ हे‎विषारी घटक असते. रायसीन हे‎मानवी शरीरातील पेशींची प्रथिने‎बनवण्याची क्षमता नष्ट करते,‎एरंडीच्या बीचे बाह्य कवच तुटून‎जर बी चावली तर हे विष शरीरात‎शोषले जाते. बिया खाल्यास तीव्र‎मळमळ आणि उलट्या होतात.‎ अधिकारी दाखल‎ एकाचवेळी १३ जणांना‎विषबाधेची लक्षणे जाणवल्याची‎माहिती मिळताच जिल्हा आरोग्य‎अधिकाऱ्यांचे पथक शुक्रवारी‎वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात‎पोहोचले. पथकाने डॉक्टरांकडून‎प्रकृती आणि उपचारांची माहिती‎ घेतली.‎ १३ बालकांवर‎उपचार सुरू‎ कल्याणी आव्हाड (११),‎प्राची त्रिभुवन (११), आयुष‎त्रिभुवन (५), आर्यन‎त्रिभुवन (११), अनुप‎त्रिभुवन (९), जयश्री‎आव्हाड (१८), खुशी‎आव्हाड (११), अंजली‎पवार (११), राधिका‎आव्हाड (११), केवल्या‎जनगरे (३), सुप्रिया त्रिभुवन‎(१४), साहिल आव्हाड‎(१८) आणि रोहिणी‎आव्हाड (१४) यांच्यावर‎उपचार सुरू आहेत. या‎मुलांच्या रक्ताचे नमुने‎प्रयोगशाळेत पाठवले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *