Headlines

13 लाख हाताशी, तरी वर्गणीतून उभे राहिले 2 कोटींचे मंदिर‎:श्रीक्षेत्र राजूर येथील राजुरेश्वर मंदिर उभारणीची रंजक कथा; वास्तुतज्ज्ञ चंद्रप्रकाश शर्मा यांच्याच शब्दांत…‎




श्रीक्षेत्र राजूर येथील राजुरेश्वराचे‎‎भव्य मंदिर‎‎संपूर्ण‎‎महाराष्ट्राचे‎‎वैभव आहे.‎‎४९ वर्षांपूर्वी,‎‎१९७७ मध्ये,‎‎या मंदिराच्या‎‎पुनर्विकासाचा‎मुद्दा पुढे आला. १९८५ मध्ये प्रत्यक्ष‎काम सुरू झाले. आता ७७ वर्षांचे‎जालना शहरातील चंद्रप्रकाश‎मोतीलाल शर्मा हे या मंदिराचे‎वास्तुतज्ज्ञ तसेच प्रकल्पप्रमुख होते.‎मंदिराच्या उभारणीसंदर्भात त्यांनी‎दिलेली माहिती त्यांच्या शब्दांत.‎ १९७७ मध्ये पुढे आली राजुरेश्वराचे मंदिर उभारण्याची संकल्पना, ४९ वर्षांच्या तपानंतर तयार झाले महाराष्ट्राचे वैभव‎ ‘मी जालना शहरातील पहिला प्रॅक्टिसिंग‎इंजिनिअर. १९७७ मध्ये राजूर मंदिराच्या ट्रस्टींनी‎मंदिराचा पुनर्विकास करण्याचा निश्चय केला.‎त्यासाठी मला विचारणा झाली. मूळ मंदिर १२‎बाय १२ फुटांचे होते. ते हेमाडपंती पद्धतीचे,‎खणाचे होते. शिखर नव्हते. छतावर मातीचा ढीग‎होता. मंदिराच्या विश्वस्तांना पूर्व बाजूने प्रवेशद्वार‎हवे होते. त्यावर शिखर करायचे होते. मी माझ्या‎पद्धतीने प्लॅन तयार करून दिला. १९८१ ला जालना‎जिल्हा निर्मितीनंतर नानासाहेब पाटील हे‎जिल्हाधिकारी म्हणून आले. त्यांनी मला बोलावून‎घेतले. कामाला वेग देण्याच्या सूचना दिल्या. मूळ‎मूर्तीला अजिबात धक्का न लावता हे काम‎करायचे, अशा सूचना प्रशासन व विश्वस्तांनी‎दिल्या होत्या. त्यानुसार मी काम सुरू केले. मूळ‎मंदिराच्या समोर एक टेकडी होती. तेथे सभामंडप‎तयार करायचा होता. त्यासाठी आम्ही खोदकाम‎सुरू केले. परंतु ती टेकडी नव्हती. तो चक्क‎मातीचा ढीग होता. त्यामुळे मजबूत पाया‎मिळण्यासाठी आम्हाला तब्बल ३० फूट खाली‎जावे लागले. ३० फूट खाली जाऊन जर छोटेसे‎शिखर आणि अर्धमंडप उभारायचा असेल, तर‎काय अर्थ? म्हणून मी नानासाहेब पाटील यांना‎सर्व माहिती दिली. मोठा प्लॅन तयार करण्याचा‎प्रस्ताव दिला. त्यांनीही तातडीने होकार दिला.‎त्यानुसार गाभारा, सभामंडप, समोर पायऱ्या,‎भव्य शिखर असा प्लॅन मी तयार केला. तेव्हा‎ट्रस्टकडे १३ लाख रुपये होते. या कामाचे‎अंदाजपत्रक १ कोटी ६७ लाख रुपयांचे होते…। या‎प्लॅनचे काय होणार, याची सर्वांनाच चिंता होती,‎मात्र लोकवर्गणीतून पैसे येत गेले व काम होत‎गेले. शेवटीपावणेदोन कोटींचे मंदिर उभे राहिले.’‎ देवाच्या कृपेनेच १९९९‎मध्ये स्ट्रक्चरल वर्क पूर्ण‎ कामाचा ठेका न देता लेबर कंत्राट‎द्यायचे. जसे पैसे येतील तसे मटेरियल‎पुरवायचे या अटींवर काम सुरू झाले.‎पुढे पैसे येत गेले. काम होत गेले. १९९२‎मध्ये जमिनीपासून ११० फूट उंचीचे‎भव्य शिखर तयार झाले. १९९५ ला‎त्यावर पंचधातूचा भरीव कळस‎प्रतिष्ठापित केला. तेव्हा अनेकांनी‎आश्चर्य व्यक्त केले. १९९९ मध्ये‎आम्ही सर्व स्ट्रक्चरल वर्क पूर्ण केले,‎असेवास्तुतज्ज्ञ चंद्रप्रकाश शर्मा यांनी‎सांगितले. देवाच्या कृपेनेच हे काम होत‎गेल्याचे ते म्हणाले.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *