आषाढीच्या पूजेला येताय, जनाची नाही मनाची लाज वाटू द्या:रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल; शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप
शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. पंढरपूरला येण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या सरकारमधील मंत्र्यांनी एकदा नाही तर दोन वेळा विचार केला पाहिजे, असा टोला लगावताना रोहित पवार यांनी सरकारला खडेबोल सुनावले. ते म्हणाले, “आषाढीच्या पूजेला येताय आणि या पवित्र भूमीत दिलेला…