Headlines

पार्थ पवार-कायनात धर यांचा शाही साखरपुडा:पुण्यातील हॉटेलात रंगला सोहळा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह दिग्गज नेत्यांची हजेरी




राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्यसभा खासदार पार्थ पवार आणि कायनात धर यांच्या साखरपुडा सोहळ्याचे आज पुण्यात उत्साहात आयोजन करण्यात आले. येरवडा येथील आलिशान ‘द रिट्स कार्लटन’ हॉटेलमध्ये मोजक्या निमंत्रितांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडत असून, राजकीय, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या सोहळ्यास उपस्थिती लावली आहे. संध्याकाळी सात वाजल्यापासून साखरपुडा सोहळ्याची लगबग सुरू झाली होती. पवार आणि धर कुटुंबीयांच्या जवळच्या नातेवाईकांसह निवडक पाहुण्यांच्या उपस्थितीत हा समारंभ पारंपरिक आणि कौटुंबिक वातावरणात पार पडत आहे. राजकीय मान्यवरांची मोठी उपस्थिती या सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व ४० आमदार निमंत्रित असून, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्यासह विविध पक्षांतील सुमारे १५ खासदार उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या कौटुंबिक कार्यक्रमाला राजकीय रंगही चढल्याचे पाहायला मिळाले. निमंत्रितांमध्ये भाजपचे खासदार निशिकांत दुबे, राज्यसभा सदस्या सुधा मूर्ती, खासदार सी. एम. रमेश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उद्योजक मोहित कंबोज यांचाही समावेश आहे. एकनाथ शिंदेंनी दिल्या शुभेच्छा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साखरपुडा सोहळ्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहिले. त्यांनी पार्थ पवार आणि कायनात धर यांना शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल वैवाहिक आयुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. या भेटीचे छायाचित्रेही समोर आली असून ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. अजित पवारांसोबत नवदाम्पत्याचा फोटो दुर्दैवाने आजच्या या आनंदाच्या प्रसंगी अजित पवार नाहीत. मात्र, सोहळ्याच्या मुख्य सभागृहात पार्थ पवार आणि कायनात धर या जोडीसोबत अजित पवार यांचे एक छायाचित्र लावण्यात आले होते, जे उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या समारंभाला उपस्थित राहून पवार आणि धर कुटुंबीयांचे अभिनंदन करणार असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी झाली होती विवाहाची घोषणा पार्थ पवार आणि कायनात धर यांच्या विवाहाची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. त्यानंतर या दोघांची पहिली सार्वजनिक उपस्थिती रेवती सुळे यांच्या विवाह सोहळ्यात पाहायला मिळाली होती. त्यानंतर त्यांच्या साखरपुड्याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. २७ फेब्रुवारी २०२७ रोजी बारामतीत विवाह साखरपुड्यानंतर पार्थ पवार आणि कायनात धर यांचा विवाह २७ फेब्रुवारी २०२७ रोजी बारामती येथे पार पडणार आहे. विवाह सोहळाही पारंपरिक पद्धतीने आणि कुटुंबीय, नातेवाईक तसेच निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती मिळाली आहे. आजचा साखरपुडा समारंभ साधेपणा, कौटुंबिक वातावरण आणि राजकीय मान्यवरांच्या उपस्थितीमुळे विशेष चर्चेत राहिला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *