Headlines

गौडगावमधील मारुतीच्या चरणी राज्य:परराज्यामधील भक्त लीन, मारुती अन्नछत्र मंडळात भाविकांनी घेतला प्रसाद‎




भक्ती आणि श्रद्धेचे माहेरघर असलेल्या ऐतिहासिक जागृत गौडगाव येथील श्री दक्षिणमुखी मारुती अन्नछत्र मंडळात सध्या राज्यभरातून व परराज्यातून येणाऱ्या भाविकांचा ओघ प्रचंड वाढला आहे.”जय श्रीराम”,”जानकी पुत्र हनुमान की जय” आणि “जय बजरंगबली” यांच्या जयघोषाने आणि मारुतीरायाच्या नावाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला असून, संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आहे. शनिवारी पहाटेपासूनच धार्मिक विधी आणि रुद्राभिषेक विधिवत विशेष होमहवन आणि अन्य धार्मिक विधी पार पडला. या सर्व धार्मिक विधींमध्ये परिसरातील तसेच दूरवरून आलेल्या शेकडो भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन महापूजा केली. सलग ११ शनिवार किंवा मंगळवार मारुतीचे मनोभावे दर्शन घेतल्यास भक्तांच्या मनातील सर्व इच्छा-आकांक्षा व मनोकामना पूर्ण होतात. याच गाढ श्रद्धेपोटी सोलापूरसह महाराष्ट्र आणि कर्नाटक, आंध्र प्रदेश यांसारख्या शेजारील परराज्यांमधूनही हजारो नियमित मारुतीभक्त गौडगावला आवर्जून हजेरी लावत आहेत. सकाळी ५ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागत असून, मारुतीरायाच्या कृपेने भक्तांना मानसिक शांतता आणि असीम ऊर्जा मिळत आहे. अन्नछत्रात घेतला भाविकांनी प्रसाद भाविकांच्या मनोकामना पूर्ण झाल्या आहेत, अशा अनेक कृतार्थ भक्तांकडून दर शनिवारी या अन्नछत्र मंडळात सढळ हाताने मदत आणि भरघोस आर्थिक अनुदान दिले जात आहे. अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सर्व विश्वस्त मंडळींच्या उत्कृष्ट, शिस्तबद्ध आणि पारदर्शक नियोजनामुळे हे मंदिर आज संपूर्ण परिसरात एक आदर्श आणि नावाजलेले धार्मिक केंद्र म्हणून नावारूपास येत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *