![]()
दक्षिण मुंबईतील कोस्टल रोडवर आज पहाटे 5:20 वाजता एक भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला, तर 20 वर्षांचा एक तरुण गंभीर जखमी आहे. मरीन ड्राईव्हकडून हाजी अलीकडे जाणाऱ्या भरधाव काळ्या रंगाच्या कारचा लाला लजपतराय कॉलेजसमोरील लोटस जेट्टीजवळ भीषण अपघात झाला. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार जोरदार धडकली आणि तिचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातामध्ये 3 तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. शनाय गज्जल (वय 21), धीर्या सेठ (वय 17) आणि सुमारे 25 वर्षांचा एक अज्ञात तरुण अशी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे असून, नायर रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले. तर, कारमधील आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अतिवेग ठरला अपघाताचे मुख्य कारण स्थानिक पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, वाहनाचा अत्यंत वेग हेच या अपघाताचे मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहे.. पहाटेच्या वेळी रस्ता मोकळा असल्याने कार अतिवेगात होती आणि लोटस जेट्टीजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य राबवले. 20 वर्षांच्या जखमी तरुणाला नायर रुग्णालयाच्या ट्रॉमा वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. ..हे वृत्त आम्ही अपडेट करत आहोत
Source link
मुंबईत भरधाव BMW ने 4 जणांना चिरडले:3 जणांचा मृत्यू, एक गंभीर; मरीन ड्राइव्हहून हाजी अलीकडे जात होती कार