दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकारणावर आणि मातोश्रीसमोर झालेल्या आंदोलनावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. दिशा सालियानच्या निधनाचे आम्हा सर्वांना दुःख आहे. पण तिच्या
.
संजय राऊत म्हणाले की, त्यांनी कोणत्या महान कार्यासाठी पक्ष सोडला हे त्यांनाच माहीत. दुष्काळाच्या बैठकीत कसे वागावे याचे भान सत्ताधाऱ्यांना उरलेले नाही. बाहेर राज्यातील जनता दुष्काळाने आणि भुकेने व्याकुळ झालेली असताना बैठकीत हे सत्ताधारी काजू-बदाम खाण्यात व्यस्त आहेत. शासनाने तिथे ड्रायफ्रुट ठेवायलाच नको होते, असा टोला त्यांनी लगावला.

फडणवीसांना विदर्भातील शेतकऱ्यांची तरी फिकीर आहे का?
संजय राऊत म्हणाले की, 800 हून अधिक गावे पाण्याच्या टंचाईचा सामना करत आहेत. सरकारने तात्काळ दुष्काळ जाहीर करून चारा छावण्या आणि पाण्याचे टँकर सुरू केले पाहिजेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाण्यापेक्षा आपल्या विदर्भातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थिती समजून घ्यावी. शेतकरी मरत असताना सरकारला दुष्काळ जाहीर करण्यासाठी कसले नियम अडवत आहेत? असा सवाल त्यांनी केला.
मध्यमवर्गीयांची फिकीर नाही, भाजप व्यापार्यांचे सरकार
संजय राऊत म्हणाले की, भाजप हा व्यापाऱ्यांचा पक्ष आहे आणि तो चालवणारेही व्यापारीच आहेत. आता तर व्यापाऱ्यांनीच बंड पुकारले आहे. ट्रम्प यांच्या दबावाखाली अमेरिकेचा फायदा करणारे निर्णय घेतले जात आहेत. आपल्या नेत्यांचे काही बाहेर पडू नये म्हणून हे सर्व केले जात असून, यामध्ये कोणत्या नेत्यांचे हितसंबंध जपले जात आहेत, याची चौकशी झाली पाहिजे. तसेच, केवळ पक्षांची चिन्हे गोठवून निवडणुका जिंकणे म्हणजे जीडीपी ग्रोथ नव्हे, अशी टीकाही त्यांनी केली.
हे ही वृत्त वाचा
आमदार-खासदार फोडले म्हणून सरकारला लोकांची गरज उरली नाही:शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्या- रोहित पवार

धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील येरमाळा परिसरात दुष्काळस्थितीची पाहणी करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारकडून जर राज्य सरकारला निधी हवा असेल, तर त्यांनी शिष्टमंडळ घेऊन केंद्र सरकारकडे जावे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शरद पवार हेही तुमच्यासोबत दिल्लीला येतील, तुम्ही फक्त शेतकऱ्यांसाठी मोठे पॅकेज घेऊन या, असे थेट आव्हान रोहित पवार यांनी सरकारला दिले.वाचा सविस्तर