कन्नड येथे जात प्रमाणपत्रासाठी उपविभागीय कार्यालयासमोर अंधारात सहा जणांचे उपोषण
महादेव कोळी जात प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी कन्नड तालुक्यातील रामनगर येथील सहा ग्रामस्थ उपविभागीय कार्यालयासमोर अक्षरशः अंधारात पाणकापडाचा तंबू ठोकून उपोषणाला बसले आहेत. आज या उपोषणाचा तिसरा दिवस असूनही प्रशासनाने अद्याप याची दखल घेतलेली नाही. या उदासीनतेमुळे आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मनीषा बाळू निकम, सचिन दिगंबर बिरार्हे, रामदास पुंडलिक बिरार्हे, संतोष गोविंद निकम,…