Headlines

कन्नड येथे जात प्रमाणपत्रासाठी उपविभागीय कार्यालयासमोर अंधारात सहा जणांचे उपोषण




महादेव कोळी जात प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी कन्नड तालुक्यातील रामनगर येथील सहा ग्रामस्थ उपविभागीय कार्यालयासमोर अक्षरशः अंधारात पाणकापडाचा तंबू ठोकून उपोषणाला बसले आहेत. आज या उपोषणाचा तिसरा दिवस असूनही प्रशासनाने अद्याप याची दखल घेतलेली नाही. या उदासीनतेमुळे आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मनीषा बाळू निकम, सचिन दिगंबर बिरार्हे, रामदास पुंडलिक बिरार्हे, संतोष गोविंद निकम, ज्योती अंबादास निकम आणि शालिनी संतोष निकम हे सहा जण हक्काच्या जात प्रमाणपत्रासाठी २०२४ पासून उपविभागीय कार्यालयात चकरा मारत आहेत. अखेर, प्रशासनाच्या त्रासाला कंटाळून त्यांनी २२ जूनपासून कार्यालयाच्या संरक्षक भिंतीला लागून असलेल्या रस्त्यावरच उपोषण सुरू केले आहे. होमगार्डही रात्रभर अंधारात कर्तव्य बजावतात उपोषणस्थळी विजेची कोणतीही सोय नाही. आजूबाजूला दाट झाडी, मोकाट कुत्रे आणि डुकरांचा सुळसुळाट असल्याने आंदोलकांचा जीव धोक्यात आहे. सुरक्षेसाठी तैनात होमगार्ड कबीर सय्यद, पटेल शेख असलम, नयना साळवे आणि अर्चना आवटे यांना बसण्यासाठी साधे छप्पर किंवा खुर्चीही नाही. तेही रात्रभर अंधारात कर्तव्य बजावत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *