पाक सिंधू नदीच्या पाण्यासाठी आसुसलेला:लष्करप्रमुखांचे भारताविरोधात कट कारस्थान, नियंत्रण रेषेवर 35 ड्रोन युनिट्स तैनात
भारताने सिंधू नदीचे पाणी अडवून पाकिस्तानच्या घशाला कोरड पाडली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सिंधूचे पाणी अडवल्याने पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे. पाण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयातही तोंडघशी पडल्यानंतर, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ युद्धाच्या धमक्या देत आहेत. तर, युद्धाचा मनसुबा बाळगलेले लष्करप्रमुख आसिम मुनीर कट रचण्यात गुंतले आहेत. एलओसी (नियंत्रण रेषा) वर…