Headlines

जात पडताळणीतील समस्या दूर करण्याची केली मागणी:समस्येबाबत विभागीय आयुक्तांना निवेदन




जात पडताळणी प्रक्रियेतील विलंब व त्रुटीचे कारणे दाखवत जात पडताळणीसाठी विलंब केला जात आहे. जात प्रमाणपत्र काढण्यासाठी जुने महसुली पुरावे, जसे की कोतवाल बुकची नक्कल, जुनी शाळा सोडल्याचा दाखला किंवा वडिलांच्या प्राथमिक शाळा प्रवेश निर्गम उतारा. रक्ताच्या नात्यातील नातेवाईकांचे जास्तीत जास्त पुरावे जोडले जातात अचूक वंशावळ जोडल्यावरच उप विभागीय अधिकारी जात प्रमाणपत्र दिले जाते तेच पुरावे जात पडताळणी साठी दिले गेल्यावर जात पडताळणी साठी विनाकारण विलंब केला जातो यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होते. यासाठी छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयात आयुक्त जी श्रीकांत यांना हैदराबाद गॅझेटीअर प्रमाणे मिळत असलेले कुणबी ओबीसी सर्टिफिकेट याची लवकरात लवकर जातपडताळणी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विभागीय आयुक्त कार्यालया मार्फत निवेदन देण्यात आले. जी श्रीकांत आयुक्त यांना निवेदन देऊन पुढील कारवाईसाठी शासनाकडे पाठवावे, अशी मागणी केली. यावेळी डॉ, मनीषा मराठे, कल्पना साखळे, भक्ती गांगुर्डे, सुलभा जाधव, विष्णू चव्हाण, माऊली कणके, अतुल तवार, गजानन लांडगे, विजयश्री तुपे, उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *