Headlines

माणसांसोबत प्राण्यांनाही अग्निशमन दलाचे ‘जीवदान':वेगवान कृतीसह नियोजन, धाडसामुळे जिवित हानी टळली- सर्वत्र कौतुक‎




अग्निशमन विभागातील जवानांनी विघ्नहर्ता बनून अनेकांच्या जीवाचे आजवर रक्षण केले आहे. त्यांच्या अथक परिश्रमासह नियोजनबद्ध कामामुळे जानेवारी महिन्यापासून ते आतापर्यंत आगीत वित्तहानी झाली असली तरी जीवाहानी मात्र टाळण्यात यश आले आहे. प्रत्येक वेळी हे जवान आपल्या सर्वांच्याच बाप्पांसारखे विघ्नहर्ता बनून रक्षणासाठी धावून जात असल्याचे दिसून आले आहे. मग ती आगीची घटना असो, कोणी मनुष्य किंवा प्राणी विहिरीत पडला असो किंवा कोणी एखाद्या संकटात अडकला असो मनपाच्या अग्निशमन विभागाने त्याला संकटमोचक बनून मदतीचा हात दिला आहे. विहिरीत पडलेल्या व्यक्तीला १० मिनिटांत काढले बाहेर अग्निशमन मुख्यालयात रविवार १९ जुलै रोजी सायंकाळी ७.१५ वाजता नगरसेवक ऋषी देशमुख यांनी नवसारी परिसरातील श्रम साफल्य कॉलनीतील विहिरीत एक व्यक्ती विहिरीत पडल्याची माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन अधीक्षक अजय पंधरे, पाळी प्रमुख किशोर शेंडे यांच्या निर्देशाने फायर लॉरी ५ ते ७ मिनिटांत घटनास्थळी पोहोचली. तत्काळ योगेश ठाकरे, प्रणीत पेठे विहिरीत उतरले. १० मिनिटांत त्यांनी ४८ वर्षीय व्यक्त्तीला बाहेर काढले. नीलेश कटपेलवार, ज्ञानेश्वर चव्हाण, मोहंमद फराना, मोहंमद युसूफ यांनीही या बचाव कार्यात मदत केली. शहरातील गजबजलेल्या बियाणी चौकातील फ्युल हेडक्वॉर्टर हॉटेलला भीषण आग लागली होती. या आगीत हॉटेलचे मोठे नुकसान झाले. यात अग्निशमन अधीक्षक अजय पंधरे, केंद्र प्रमुख प्रेमानंद सोनकांबळे, पाळी प्रमुख किशोर शेंडे यांच्या मार्गदर्शनात मनोहर राठोड, शेख तौसिफ, कासम खान, नरेंद्र कोकणे, राजू शेंडे, विशाल भगत, हर्षद दहातोंडे, मोहन वानखडे, मोहंमद ताहीर, राहुल घोडे, प्रशांत गोडे, जयकुमार वानखडे, शुभम लंगोटे यांनी अचूक बचाव केला. मनुष्यच नव्हे तर प्राण्यालाही वाचवले विहिरीत पडलेल्या मनुष्यालाच नव्हे तर प्राण्यालाही अग्निशमन जवानांनी वाचवल्याच्या अनेक घटना आहेत. १८ जून रोजी सकाळी ८.३५ वाजता सुरज तायडे यांनी फोनद्वारे पीडब्ल्यूडी कार्यालयातील एका विहिरीत श्वान पडले आहे.त्यानंतर तत्काळ फायर लॉरीसह नितीन इंगोले, फायरमन मनीष उताणे, राजेश गजबे, मोहन वानखडे तत्काळ घटना स्थळी पोहोचले. त्या श्वानाला विहिरीतून जिवंत बाहेर काढण्यात आले. घटना 1



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *