Headlines

अभ्यास, शिस्त अन् परिश्रमाने ग्रामीण विद्यार्थी होतील यशस्वी:अमरावतीचे उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन‎




विद्यार्थ्यांनी परिस्थिती कोणतीही असली तरी मोठी स्वप्ने पाहावीत, त्यासाठी सातत्याने अभ्यास, मेहनत, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही मोठी क्षमता असून योग्य मार्गदर्शन व परिश्रमाच्या जोरावर ते उच्च पदांवर पोहोचू शकतात, असे प्रतिपादन अमरावतीचे उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी केले. काकडे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणी येथे भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण, स्पर्धा परीक्षा, ध्येय निश्चिती आणि जीवनातील यशाबाबत मार्गदर्शन केले. तसेच शाळेसाठी दोन संगणक संच भेट दिले. या भेटीदरम्यान रांजणी शाळेतील विद्यार्थ्यांनी काकडे यांची विशेष मुलाखत घेतली. त्यांच्या बालपणीचे शालेय जीवन कसे होते, लहानपणी मोठे होऊन काय बनण्याचे स्वप्न होते, उपजिल्हाधिकारी होण्याची प्रेरणा कुठून मिळाली, या पदासाठी कोणत्या प्रकारचा अभ्यास करावा लागतो, त्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान किती महत्त्वाचे होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत का व ती साकारण्यासाठी काय करावे, अधिकारी नसते तर कोणते काम करायला आवडले असते, प्रशासकीय कामातील सर्वात आव्हानात्मक बाब कोणती, तसेच रांजणी शाळेतील विद्यार्थ्यांना कोणता संदेश द्याल, अशा विविध प्रश्नांची उत्तरे काकडे यांनी विद्यार्थ्यांना दिली. या मुलाखतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली. शालेय जीवनात अभ्यासाचे काय महत्व आहे. अभ्यास कसा करावा, स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी याची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. विद्यार्थ्यांच्या भविष्यातील शैक्षणिक वाटचालीसाठी काकडे यांनी दिलेली माहिती निश्चितच मार्गदर्शक ठरेल असा विश्वास यावेळी उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या पालकांनीही या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच काकासाहेब घुले होते. ग्रामपंचायत सदस्य योगेश्वर गवळी, केंद्रप्रमुख योगेश राजळे, अरुण थोरात, उपसरपंच कैलास मोरे, नानासाहेब गवळी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप थोरात, रामजी शिदोरे, मेजर विष्णू आधाट, एकनाथ चेमटे, सोमनाथ कर्डिले आदींसह पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक विलास लवांडे यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक मोहन पाऊलबुद्धे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी सांगवी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चिमुकल्यांनी घेतली उपजिल्हाधिकाऱ्यांची मुलाखत रांजणी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी घेतलेली उपजिल्हाधिकारी काकडे यांची विशेष मुलाखत घेतली. विद्यार्थ्यांनी अगदी निसंकोचपणे त्यांना बालपणीचे शालेय जीवन, लहानपणीचे स्वप्न, अधिकारी होण्याची मिळालेली प्रेरणा आणि अभ्यासाचे नियोजन याबद्दल प्रश्न विचारले. अधिकारी नसता तर काय झाला असतात, प्रशासकीय सेवेतील आव्हाने कोणती, तसेच यशात शिक्षकांचे स्थान काय, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे काकडे यांनी अत्यंत सोप्या आणि रंजक भाषेत दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *