![]()
शहरात ‘डॉग बाईट’च्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळेच मोकाट श्वानांची अशी काही दहशत पसरली आहे की, नागरिकांना मॉर्निंग, इव्हिनिंग वॉकही धोकादायक वाटायला लागले आहेत. घोळक्याने फिरणारे हे श्वान केव्हा हल्ला चढवून चावा घेतील याचा नेम राहिला नाही. आरोग्यासाठी
.
ज्यांना मोकळ्या रस्त्यावरून फिरण्याची सवय आहे, ते सुरक्षेसाठी हातात काठी ठेवत आहेत. या मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्यात कायदा, वन्य जीव संघटनांचे दडपण असल्यामुळे महानगर पालिकेच्या पशू विभागालाही विचारपूर्वक काम करावे लागते.
निर्बिजीकरण, लसीकरण २ ऑक्टोबरला करणार शहरातील मुख्य ठिकाणे जसे शाळा, महाविद्यालये, रेल्वे स्टेशन, बस स्थानक, बाजार, मुख्य चौकांमध्ये असलेले श्वान पकडून त्यांचे निर्बिजीकरण, लसीकरण केले जाणार आहे. त्यानंतर हे श्वान शेल्टर हाऊसमध्ये नेऊन टाकले जातील. कारण, त्यांना मोकळे सोडले तर वन्य जीव, प्राणिमित्र संघटना या आरडा, ओरडा करतात, त्यांच्या धाकामुळे तसे करता येत नाही.
दिवसाला शहरात सरासरी १० ‘डॉग बाईट’ शहरात दिवसाला सरासरी १० ‘डॉग बाईट’च्या, ओरबाडण्याच्या घटना घडत आहेत. वाहन चालकांच्या पाठिमागे रात्री कुत्र्यांनी धावण्याचे प्रकार तर दररोज घडत असतात. तरी या मोकाट श्वानांचा अद्याप बंदोबस्त करण्यात मनपा प्रशासन अपयशी ठरले आहे. डॉग बाईटचे शिकार ठरलेल्यांमध्ये ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी, मध्यम वयीनांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
पहाटे, सायंकाळी फिरायची भिती वाटते ^पहाटे तसेच सायंकाळी फिरायला निघालो की, मोकाट कुत्री घोळक्याने मागे लागतात. त्यामुळे हातात काठी घेऊनच पायी फिरावे लागते.श्वानांची संख्या शहरात वाढली असून यावर कोणाचेही नियंत्रण दिसत नाही. – जनार्दन राऊत, नागरिक.
तक्रार करावी, तत्काळ कारवाई करू मोकाट श्वान,जनावरांपासून जर नागरिकांना त्रास होत असेल तर त्यांनी तक्रार करावी. आम्ही तत्काळ कारवाई करू. कारवाई करण्यासाठी झोननिहाय पथके स्थापन करण्यात आली आहेत. नागरिकांनी झोनमध्ये माहिती द्यावी. – संतोष देशमुख, पशू शल्य चिकित्सक, मनपा.