![]()
पक्ष्यांच्या हालचाली, झाडांमधील बदल तसेच आकाशातील स्थितीचे निरीक्षण करून हवामानातील बदलांचा अंदाज घेता येतो, असे प्रतिपादन हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी केले. वाशिंबे (ता. करमाळा) येथील नवयुग कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित हवामान मार
.
पक्षी, झाडे, वाऱ्याची दिशा, आकाशातील ढगांची रचना आणि वातावरणातील बदल यांचे निरीक्षण करून हवामानातील संभाव्य बदलांचे निसर्गाचे संकेत ठरतात महत्त्वाचे, त्यावरच पाऊस येतो हवामानातील संभाव्य बदलांचा अंदाज घेताना केवळ एका संकेतावर अवलंबून न राहता विविध नैसर्गिक घटकांचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे. वाऱ्याचा वेग व दिशा, ढगांचे स्वरूप, वातावरणातील आर्द्रता आणि तापमानातील चढ-उतार यांसारख्या बाबींची नोंद शेतकऱ्यांना शेती नियोजनात उपयुक्त ठरू शकते. मात्र, पारंपरिक निरीक्षणांबरोबरच अधिकृत हवामान विभागाच्या अंदाजाची पडताळणी करणेही महत्त्वाचे आहे. विशेषतः पेरणी, फवारणी, काढणी किंवा सिंचनासारखे निर्णय घेताना अद्ययावत हवामान माहितीचा आधार घ्यावा. संकेत मिळू शकतात, असेही डख यांनी स्पष्ट केले. उपस्थित शेतकरी व नागरिकांनी हवामानाचा अंदाज, पावसाचे संकेत आणि शेती नियोजनाबाबत विविध प्रश्न विचारले. त्यावर पुढील आठ दिवसांत तालुक्यात पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज पंजाब डख यांनी व्यक्त केला. कार्यक्रमास संचालक गणेश झोळ, उपसभापती अजित विघ्ने, संचालक अजित झंझुर्णे, माजी सरपंच भगवान डोंबाळे, कल्याण शिंदे, प्रा. जाकीर शेख आदी उपस्थित होते.
अल निनोबाबतही केले मार्गदर्शन अल निनोविषयी माहिती देताना डख म्हणाले की, दक्षिण अमेरिका खंडातील पेरू देशाच्या परिसरातील प्रशांत महासागराच्या पाण्याच्या तापमानातील वाढीशी अल निनोचा संबंध आहे. भारत आणि अमेरिका पृथ्वीच्या विविध बाजूस असल्यामुळे अल निनोचा भारतावर थेट परिणाम होत नाही, असे त्यांनी सांगितले.