Headlines

शेतकऱ्यांना कर्ज घ्यायचे कामच पडणार नाही,अशी व्यवस्था निर्माण करा- पाटील:शेतकरी संघटनेचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर, मान्यवरांनी केले मार्गदर्शन‎




शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांच्या जयंतीचे औचित्य साधून बालाजी मंगल कार्यालयाच्या प्रांगणात शेतकरी तंत्रज्ञान स्वातंत्र्य कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजित केले. कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती करुन शेतकऱ्यांना कर्ज घ्यायचे कामच पडणार नाही अशी, व्यवस्था निर्माण करावी, शेतमालावरील निर्यातबंदी उठवून शेतमालाला योग्य तो रास्त भाव द्यावा, अशी मागणी रघुनाथ पाटील यांनी केली. रघुनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शिबिरात कार्याध्यक्ष कालिदास आपेट, मनोहरलाल फाफट, विदर्भ प्रमुख लक्ष्मीकांत कौठकार, श्याम येडेकर, अनुरथ काशिद, शेतकरी जागर मंचचे प्रशांत गावंडे, महिला आघाडीच्या प्रमिला भारसाकळे, सिंधुताई देऊळकार, प्रमिला बोंबटकार, गोदावरी इंगळे, पंकज माळी,संजय देशमुख व संतोष गुंड, निवृत्ती वानखडे व जगन बगाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ पाटील, विदर्भ प्रमुख लक्ष्मीकांत कौठकार व कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांच्या नेतृत्वात महिला आघाडी व युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या सहभागाने रॅलीने शेतकरी संघटनेचा ध्वज हातात घेऊन कार्यकर्ते शिबिर स्थळी पोहोचले. सुरुवातीला शरद जोशी अमर रहे च्या घोषणा देऊन प्रतिमा पूजनाने शिबिराला सुरुवात झाली. अन्यथा तीव्र आंदोलन वेळोवेळी शेती मालाची निर्यात बंदी करुन सरकार शेती मालाला भाव मिळू देत नाही त्यामुळे आम्ही सरकारचे देणे लागत नाही म्हणून यापुढे आम्ही शेती कर्ज व राहत्या घराची वीज बिले देणार नाही, स्मार्ट मीटर आम्हाला मान्य नाही ते महावितरणने काढून घ्यावे अन्यथा आम्ही स्वतः त्यांच्या कार्यालयात जमा करु, वनविभागाने वन्यप्राण्यांचा वाढलेला त्रास बंद करावा अन्यथा संघटना तीव्र आंदोलन करेल, असा इशारा विदर्भ अध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकार यांनी दिला. शिबिरात यावर झाली चर्चा शिबिरात शेतकरी विरोधी कायदे,अमेरिका भारत कृषी करार, शेतकरी तंत्रज्ञान स्वातंत्र्य, विद्युत स्मार्ट मीटर, वन्यप्राण्यांचा त्रास,पीक विमा व सरकारी अनुदान, देशातील विविध आंदोलने यावर चर्चा केली. याप्रसंगी संघटनेच्या विविध आंदोलनात अग्रेसर असणाऱ्या ३० सक्रिय महिला कार्यकर्त्यांचा अध्यक्ष रघुनाथ पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. ‘कर कर्जा नही देंगे, बिजली का बिल नही देंगे’ या घोषणेने शिबिराचा शेवट झाला. कार्यक्रमाचे संचालन गावप्रमुख अमोल मसुरकार यांनी केले. तालुका प्रमुख नीलेश नेमाडे यांनी आभार मानले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *