![]()
नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांमधून सुरू असलेल्या विसर्गात घट झाल्याने जायकवाडी धरणातील पाण्याची आवक कमी झाली आहे. बुधवारी (२९ जुलै) रात्री ९ वाजेपर्यंत जायकवाडी धरणात २० हजार ६८६ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू होती. या आवकीमुळे धरणातील उपयुक्त जिवंत पाणीसाठा ६७.६० टक्क्यांवर पोहोचला असून, सध्या ५१.६० टीएमसी (१४६१.३१६ दशलक्ष घनमीटर) इतका जिवंत पाणीसाठा जमा झाला आहे. धरणाची सध्याची पाणीपातळी १५१५.५० फूट झाली असून, पूर्ण संचय पातळी १५२२ फूट आहे. धरणातील एकूण पाणीसाठा ७७.६६ टीएमसीवर पोहोचला असून, त्याची एकूण साठवण क्षमता १०२.७३ टीएमसी इतकी आहे. वरच्या धरणांतून होणाऱ्या विसर्गात लक्षणीय घट झाली आहे. नांदूर-मधमेश्वर वेअरमधून १७,२६९ क्युसेक पाणी गोदावरी पात्रात सोडले जात आहे. याशिवाय दारणा धरणातून ५,४०८, होळकर पुलावरून ३,३४८, गंगापूर धरणातून ३,२७६, कडवा धरणातून २,३१९, भंडारदरा ३,०५८, निळवंडे २,०८५, ओझरखेड १९१ आणि पालखेड धरणातून ७२२ क्युसेक विसर्ग सुरू असल्याचे अभियंता मंगेश शेलार यांनी सांगितले.
Source link
जायकवाडी:धरणामधील जलसाठा 67.60 टक्क्यांवर